Header AD

लोकलमध्ये विसरलेली पायलट एव्हीएम प्रोजेक्ट मशीन प्रवाश्याला रेल्वे सुरक्षा बलामुळे परत मिळाली
डोंबिवली , शंकर जाधव  : अमरावती येथे राहणारे आनंद पी. मिश्रा कोटकर हे शनिवारी  दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते डोंबिवली रेल्वे स्थानक या धीम्या गतीच्या लोकल मध्ये चढले. त्यांनी आपली बँग रेल्वे डब्बाच्या खिडकीवरील रॅकवर ठेवली होती.मात्र समोरील फलाटावर जलद गतीची लोकल आल्यावर त्यांनी त्या लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी धीम्या गतीच्या लोकलमधून उतरले.मात्र इतक्यात समोरील जलदगतीची लोकल फलाटावरून निघून गेली.


त्यावेळी आपल्याकडील बँग धीम्या गतीच्या लोकलमध्ये विस्ल्याचे लक्षात आले.परंतु तीही लोकल फलाटावरून निघू गेली.आनंद पी.मिश्राकोटकर यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना याची माहिती दिली. त्यांनी तत्काळ १८२ या हेल्पलाईन नंबरवर सदर घटनेची माहिती दिली. आनंद पी.मिश्राकोटकर यांच्या बँगेत ३५ हजार रुपये किमतीचे पायलट एव्हीएम प्रोजेक्ट मशीन होते.याची माहिती डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाला कळल्यावर त्यांनी कामिनी सोनकर आणि सिद्धार्थ कोले यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात आल्यावर रेल्वे डब्ब्यात सदर बँग मिळाली. 


बँग मिळाल्यावर डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक हरफुल सिंह यादव यांनी आनंद पी.मिश्राकोटकर यांना दिली.आपली बँग परत मिळाल्याबद्दल मिश्राकोटकर यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे आभार मानले.आनंद पी.मिश्राकोटकर हे एका खाजगी कंपनी काम करतात.शुक्रवारी आनंद पी.मिश्राकोटकर हे मुंबईत मंत्रालयात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर सदर पायलट एव्हीएम प्रोजेक्ट मशीनचा डेमो देण्यासाठी गेले होते.

लोकलमध्ये विसरलेली पायलट एव्हीएम प्रोजेक्ट मशीन प्रवाश्याला रेल्वे सुरक्षा बलामुळे परत मिळाली लोकलमध्ये विसरलेली पायलट एव्हीएम प्रोजेक्ट मशीन प्रवाश्याला रेल्वे सुरक्षा बलामुळे परत मिळाली Reviewed by News1 Marathi on February 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads