Header AD

भिवंडीतील कांबे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण

 भिवंडी ,  प्रतिनिधी  :  भिवंडी तालुक्यातील कांबे गावातील ग्रामस्थांना पिण्याचा पाण्याचा अपुरा पुरवठा होत असल्याने आणि त्याबद्दल वारंवार संबंधित प्रशासनाला कळवूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण विशाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी भिवंडी यांच्या कार्यालयासमोर केले. स्टेम वाटर डीस्ट्रीब्युशन कंपनीच्या मनमानी कारभारामुळे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांकडुन वारंवार प्रशासनाला सांगूनही आणि स्टेम वाटर कंपनीला वारंवार पत्र व्यवहार करुन देखील कोणत्याही प्रकारची पाण्याची समस्या सुटत नसल्याने मुबलक पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करुन जर लवकरात-लवकर पाण्याची समस्या शासन प्रशासनाकडुन सोडवण्यात आली नाही तर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.सतत पाणीटंचाईमुळे भिवंडी तालुक्यातील कांबे येथील नागरिकांनी भिवंडीतील प्रशाननासोबत बैठक करून आपली पाण्या बद्दल समस्या मांडली होती आणि अनधिकृत नळ कनेक्शन असणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी केली होती. या बैठकीत तहसीलदार गोसावी , प्राधिकरण अधिकारी अजय चौधरी यांनी कांबे गावाला पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासनाला व अनेक निवेदनाला  केराच्या टोपलीत ढकलून देऊन आज पर्यंत पाणी पुरवठा वेळेवर होत नाही. फक्त दिड तास होत आहे. म्हणून कांबे येथील  नागरिकांनी आपल्या पाण्याच्या हक्कासाठी भिवंडी प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. 
गेल्या चार महिन्यापासून  पाणी पुरवठा सुरळीत  होत नसल्यामुळे  संमधीत अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटुन व पत्र्यव्यवहार करून समस्या मांडली होती आणि या सर्व मागण्यां लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले होते परंतु त्या आतापर्यंत सुटल्या नसल्याने  येथील नागरिकांनी आपल्या पाण्याच्या  मूलभूत अधिकारी साठी भिवंडी प्रांत कार्यासमोर आमरण उपोषण करण्यात आले आहे. गेल्या ४ महिन्या पासून आम्हाला संमधीत अधिकाऱ्यांपासून  आश्वासने दिली जात असून, आमची मूलभूत गरज सुद्धा प्रशासन पूर्ण करू शकत नाही याचा मोठा खेद वाटत आहे. म्हणून आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे असे विशाल कांबळे यांनी बोलतांना सांगितले.
भिवंडीतील कांबे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण भिवंडीतील कांबे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी  लाक्षणिक उपोषण Reviewed by News1 Marathi on February 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads