Header AD

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
कल्याण , कुणाल म्हात्रे  : १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या  जवानांना टिटवाळा येथील घोटसई गावातील तरुणांनी श्रद्धांजली वाहिली.  एकीकडे तरुणाई  वेलेन्टाइन डे साजरा करण्यात मग्न असतांना कल्याण नजीक असलेल्या टिटवाळा येथील घोटसई गावातील तरुण मात्र पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे स्मरण करत होते.  


१४  फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे  दहशतवाद्यानी केलेल्या  भ्याड हल्ल्यात ४१  जवान शाहिद झाले होते. त्या सर्व जवानांना राजे शिव छत्रपती व शिवमुद्रा प्रतिष्टान तसेच ग्रामस्थ मंडळ घोटसई या मंडळातील नवतरुण युवकांनी मेणबत्ती प्रजवलीत करत, फुलं अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच शहिदांप्रती आपल्या भावना व्यक्त करत इतर तरुणांनी देखील भारतीय सैन्यात सामील होण्याचा निर्धार केला.
पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली  पुलवामा हल्ल्यातील  शहिदांना श्रद्धांजली Reviewed by News1 Marathi on February 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads