Header AD

मुद्रा लोनच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या महिलांनी दिला चोप
कल्याण , कुणाल म्हात्रे  : पंतप्रधान मोदींनी 'सबका साथ सबका विकासहे उद्दिष्ट् डोळ्या समोर ठेवून  देशातील सर्व  लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजना अमलात आणली. या योजने अंतर्गत विविध बँकेतून लघु उद्योजकांना दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करण्याची सुविधा दिली. मात्र  याचा गैरफायदा घेत कल्याणातील भामट्या महिलेने हजारो महिलांकडून आमिष दाखवून तीस हजार रुपयांची आगाऊ रक्कम घेतली. 

         

      मात्र गेल्या दोन वर्षांत मुद्रा लोन मंजूर न झाल्याचे पाहून फसवणूक झालेल्या महिलांनी कल्याण तहसीलदार कार्यालयाजवळ त्या भामटीला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली.आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात त्या भामटीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी तिला अटक केली आहे.  शमीम बानो असे आरोपी महिलेचे नाव असून काँग्रेसची पदाधिकारी असलेल्या समोर आले आहे.       गेल्या दोन वर्षांपासून  हजारो महिलांना आरोपी शमीम हि महिला मुद्रा योजने अंतर्गत  लोन देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी लाभार्थी महिलांकडून हजारो रुपये उकळले होते. मात्र दोन वर्षे उलटूनही लोन मंजूर होत नसल्याने आपली फसवणूक केल्याचे समजल्यावर या महिलांनी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक विजया पोटे यांच्याकडे धाव घेत मदत मागितली. पोटे यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांना याबाबत सांगत महिलांसोबत पाठवले.          शिवसेनेच्या आशा रसाळ, राधिका गुप्ते आदी महिला पदाधिकारी या फसवणूक झालेल्या महिलांसोबत शमीम बानो हिच्याकडे गेल्या. विशेष म्हणजे आज शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह फसवणूक झालेल्या महिलांनी शमीम बानो हिला गाठून जाब विचारण्याचा प्रयत्न केला असताउलट शमीम बानो हिने त्या महिलांना उलट उत्तर देऊन हमरीतुमरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे  या महिलांनी तिला   हिला चांगलाच हिसका देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. 
       आरोपी शमीम बानो हिच्यावर कल्याण मधील विविध पोलीस ठाण्यात  फसवणूकदरोडानागरिकांकडून  धमकावून पैसे उकळणेअसे  गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. तर गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत कॉगेसच्या वतीने नेतेवली परिसरातील प्रभागातून निवडणुक लढवली होती. 


मुद्रा लोनच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या महिलांनी दिला चोप मुद्रा लोनच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या महिलांनी दिला चोप Reviewed by News1 Marathi on February 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads