Header AD

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान
ठाणे (प्रतिनिधी)  मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठामपा परिवहन सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राध्यक्ष शमीम खान यांनी केली आहे.  शमीम खान यांनी या मागणीसंदर्भात ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा, विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांना निवेदन दिले आहे. 


शमीम खान यांनी सांगितले की, कालकथीत कालसेकर यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. शैक्षणिक संस्था उभारण्यासोबतच रुग्णलयांची उभारणी करुन सामाजिक कार्याचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे त्यांचे नाव मुंब्रा ते बायपास या मार्गाला  देऊन त्यांचा सन्मान ठाणे महानगर पालिकेने करायला हवा. या संदर्भात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही अनुकूलता दर्शविली आहे. कालसेकर यांचे नाव रस्त्याला देऊन ठामपाच्याच शिरपेचात तुरा खोवला जाणार आहे, असेही खान यांनी म्हटले आहे.

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान Reviewed by News1 Marathi on February 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads