Header AD

आर्थिक वर्षात या टॉप ५ क्षेत्रांवर ठेवा नजर
◆यंदाच्या वर्षीचा आर्थिक रोडमॅप सर्वांसमोर आहे. सरकारने वृद्धीत सुधारणा करण्याचा संकल्प करत ९.५% च्या वित्तीय तुटीद्वारे सर्वांना चकित केले आहे. भांडवल बाजाराने याकडे दुर्लक्ष न करता, चांगली प्रतिक्रिया दिली व सर्वोच्च विक्रम नोंदवला. माननीय अर्थमंत्र्यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात, मेड इन इंडिया टॅबलेट वापरून बही-खात्याला बाजूला सारले यातून भारताचे डिजिटल परिवर्तनही प्रतिबिंबित झाले. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे घटक काय आहेत व कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करावी याबद्दल मार्गदर्शन करताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय.


वाहन क्षेत्र: प्रत्यक्ष खरेदीवर अवलंबून असल्यामुळे वाहन क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. हे क्षेत्राला बजेटकडून खूप अपेक्षा होत्या. अर्थमंत्र्यांनीही त्या व्यर्थ जाऊ दिल्या नाहीत. सरकारने अखेरीस बहुप्रतिक्षित ऐच्छिक स्क्रॅपेज धोरणाची घोषणा केली. या धोरणाअंतर्गत, लोक व व्यवसायांना त्यांचे १५ ते २० वर्षांपूर्वीचे वाहन भांगारात टाकण्यासाठी व नव्या खरेदीसाठी प्रोत्साहन देते. यामुळे ओईएम अर्थात (मूळ उपकरण उत्पादक) आणि भारतातील इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपन्यांना फायदा होईल.

व्यावसायिक वाहनांना १५ वर्षांनी तसेच वैयक्तिक वाहनांना २० वर्षांनी फिटनेस तपासणीला सामोरे जावे लागेल. आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम, ज्यात पीपीपीच्या नव्या मॉडेलद्वारे खासगी क्षेत्रातील कंपन्यांना वित्तपुरवठा, अधिग्रहण, ऑपरेट व २०,००० पेक्षा जास्त बसची देखभाल करता येईल. यामुळे भारतीय बस उत्पादकांना मोठा फायदा होईल. विशिष्ट ऑटो पार्ट्स जसे की इग्निशन वायरिंग सेट्स, सिंग्नलिंग उपकरणांचे भाग, सेफ्टी ग्लास यांच्यावरील सीमाशुल्क ७.५% व १०% वरून १५% वर करण्यात आले आहे. ऑटो अँसिलरी कंपन्यांना यातून फायदा होईल.


बँका व वित्तीय सेवा: पीएसबीची वित्तीय क्षमता मजबूत करण्यासाठी सरकारने २०,००० कोटी रुपयांचे आणखी पुनर्भांडवलीकरणाचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बॅलेन्स शीटमध्ये सुधारणा होईल. अॅसेट रिक्नस्ट्रक्शन कंपनी आणि अॅसेट मॅनेजमेंट कंपनी मार्गे विद्यमान कर्जही नव्या बॅड बँकेत वर्ग केले जातील. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी ही आणखी एक सकारात्मक बाब आहे. त्यांच्या ताणाखालील मालमत्तांची समस्या यातून सुटेल. किफायतशीर घरांवरील कर सवलतीतून हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना आणखी फायदा होईल. किफायतशीर गृहनिर्माण क्षेत्रात काम करणाऱ्या रिअल इस्टेट कंपन्यांमध्येही याद्वारे वाढ होईल.


फार्मा: भारतीय आरोग्य सेवा प्रणालीची क्षमता वाढवण्यासाठी सरकारने आणखी ६ वर्षांकरिता ६४,१८० कोटी रुपये खर्च जाहीर केला. यामुळे सध्याच्या राष्ट्रीय संस्थांना बळकटी मिळेल व नवीन संस्थांसाठी मार्ग सुलभ होईल. फार्मा क्षेत्राकरिता, विशेषत: ज्या कंपन्यांची देशांतर्गत विक्री जास्त आहे, अशा कंपन्यांसाठी हा निर्णय विजयी मार्गावर नेणारा ठरेल. आरोग्य व कल्याणासाठईच्या बजेटमध्येही लक्षणीय वाढ झाली. वित्तवर्षात हा निधी ९४,४५२ कोटी रुपये होता. तो दुप्पटीने वाढवून वित्तवर्ष २०२२ मध्ये २,२३,८४६ कोटी रुपये करण्यात आला. वित्तवर्ष २०२२ मध्ये कोव्हिड-१९ लसीसाठी अतिरिक्त ३५,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या उपक्रमाचा फायदा लस उत्पादकांना होईल व यावरील खर्चही वाढवला जाण्याची शक्यता आहे.


उत्पादन: पुढील ५ वर्षांत, सरकार पीएलआयच्या विविध योजनांवर १.९७ लाख कोटी रुपये खर्च करण्याच्या विचारात आहे. हा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या ४०,९५१ कोटी रुपयांच्या पीएलआय योजनेपेक्षा जास्त आहे. यामुळे उत्पादन उद्योगाला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. प्रिंटेड सक्रिट बोर्ड असेंब्ली, कॅमेरा मोड्युल आणि कनेक्टर्ससह मोबाइल फोनचे विशिष्ट इनपुट, भाग किंवा मोबाइल फोनच्या उप भागांवरही सीमा शुल्क ०% वरून २.५% पर्यंत वाढवण्यात आली आहे. भारतीय मोबाइल उत्पादक कंपन्यांना याचा फायदा होईल.


सोने, हिरे, रत्न व दागिने: सोने व चांदीवरील सीमाशुल्कात १२.५ टक्क्यांवरून ७.५ ट्कक्यांपर्यंत घट झाली. तथापि, सिंथेटिक कट व पॉलिश्ड स्टोन्स (रत्ने) यांच्यासाठी सीमाशुल्क ७.५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर वाढले. सोने, चांदी आणि डोअर बारवर कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर २.५% लागू झाला आहे. दागिने तयार करणाऱ्या कंपन्यांवर या निर्णयांचा थेट सकारात्मक परिणाम होईल. भारतीय रस्ते व दागिने बनवणाऱ्या कंपन्यांही यंदा फायद्यात आहेत.

तर, यंदाच्या अर्थसंकल्पामुळे या काही क्षेत्रांना प्रोत्साहन मिळणार आहे. तुमचा फोकस एरिया, गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि जोखिमीची भूक यानुसार, या क्षेत्रांमध्ये तुम्ही आपले स्थान निश्चित करू शकता. रिअल इस्टेट, सिमेंट, पायाभूत सुविधा, शहर गॅस वितरण, ऊर्जा, विमा आणि घरगुती उपकरणे या काही क्षेत्र तसेच उपक्षेत्रांचाही तुम्ही विचार करू शकता.

आर्थिक वर्षात या टॉप ५ क्षेत्रांवर ठेवा नजर आर्थिक वर्षात या टॉप ५ क्षेत्रांवर ठेवा नजर Reviewed by News1 Marathi on February 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads