Header AD

शिंदे मळा परिसरातील रहिवासी सांडपाण्यामुळे त्रस्त पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष


◆वेळेत उपाययोजना न केल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा...

    

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पश्चिमेतील  प्रभाग क्रमांक २१ फडके मैदान येथील शिंदे मळा परिसरातील रहिवाशी गेल्या काही वर्षांपासून नाल्यातील सांडपाणी बाहेर वाहणेशौचालयातून मलबा बाहेर वाहणे आदींमुळे त्रस्त झाले असून नागरिकांच्या या समस्येकडे पालिका प्रशासन देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर नागरिकांच्या या समस्येवर वेळेत उपाययोजना न केल्यास मनसेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक शाखाध्यक्ष महेश बनकर यांनी दिला आहे.


       कल्याण पश्चिमेतील लाल चौकी नजीक असलेल्या शिंदे मळा परिसरात शेकडो कुटुंब चाळीमध्ये राहत आहेत. येथील सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी आणि शौचालयातील मलबा वाहून नेणारी मलवाहिनी फुटल्याने हे दोन्ही पाणी एकत्र होऊन गटाराद्वारे बाहेर वाहत आहे. तसेच हे पाणी नागरिकांच्या मोरीत देखील शिरत असल्याने नागरिकांच्या घरात आणि परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. गटारावाटे हे पाणी नागरिकांच्या घरात येत असल्याने येथील रहिवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात देखील हे सांडपाणी पसरले असल्याने ये जा करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.  


परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींशी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांन सांगून हि समस्या सोडविण्याची मागणी केली होती. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. येथे मलवाहिनी त्काण्यासाठी २०१९ मध्ये १० लाखांचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता. मात्र अद्याप हे काम करण्यात आले नाही. याबाबत येथील रहिवाशांनी येथील मनसे शाखाध्यक्ष महेश बनकर यांना सांगितले असता. त्यांनी याठिकाणची पाहणी करत या समस्ये बाबत पालिका आयुक्त आणि संबंधित विभागाला पत्र दिले. पत्र देऊन ८ दिवस उलटून देखील पालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष दिले नसल्याने वेळेत हि समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


       दरम्यान याबाबत मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत मादगुंडी यांना विचारले असता, येथील कामासाठी प्रस्ताव मंजूर असून या प्रस्त्वातील प्रशासकीय काम होताच येथील काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
शिंदे मळा परिसरातील रहिवासी सांडपाण्यामुळे त्रस्त पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष शिंदे मळा परिसरातील रहिवासी सांडपाण्यामुळे त्रस्त पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष Reviewed by News1 Marathi on February 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads