३९ ते ३५ जागा द्या अन्यथा स्वबळावर निवडणूक लढू रिपाईचे भाजपला आवाहन
डोंबिवली ( शंकर जाधव ) २०१४ साली केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर येण्यास रिपाईची खूप मदत झाली.रिपाईला भाजपा हात दिल्याने रिपाईच्या बोटबँकची भाजपा खूपच फायदा झाला.मात्र स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषद, पंचायत समिती,ग्रामपंचायती निवडणुकीतरिपाईला हवे तेवढे यश आले नाही.आगामी केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणुकीत गेली १० वर्ष रिपाईचा एकही उमेदवार निवडणूक आलेला नाही.तर भाजपा-शिवसेना युतीने सत्ता मिळवली. आजही आपले उमेदवार निवडणूक येतील असे रिपाईच्या वरिष्ठांची खात्री आहे.आता रिपाईने आपले उमेदवार निवडणून आणण्यासाठी कंबर कसली असून ३० ते ३५ जागा द्या अन्यथा स्वबळावर निवडणूक लढू असे रिपाईने भाजपला आवाहन केले.डोंबिवलीत रिपाईचे डोंबिवली शहरअध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी रिपाईचे केंद्रीय निरीक्षक सुरेश बारसिंगे आले होते.
रिपाईचे डोंबिवली शहरअध्यक्ष अंकुश गायकवाड यांचा वाढदिवस डोंबिवली पूर्वेकडील जनसंपर्क कार्यालयात साजरा झाला. यावेळी रिपाईचे केंद्रीय निरीक्षक सुरेश बारसिंगे यांनी गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यानंतर पत्रकारांचा प्रश्नांची उत्तरे देताना ते म्हणाले,भाजप सध्या अडचणीत आलेला पक्ष आहे. भाजपाला केडीएमसीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ३० ते ३५ जागा दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत जरी ती विखुरलेली अवस्थेत दिसली असली रिपाई ताकद फार मोठी आहे. भाजपबरोबर आमचे जमले नाही तरी शिवसेना- कॉंग्रेस –राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही असे बारसिंगे यांनी सांगितले.रिपाईतील गटबाजी बाबत विचारले असते म्हणाले,आम्ही दोम्ही बाजूने म्हणणे ऐकू.परंतु आम्ही जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव आणि माणिक उघडे या दोघांवर अन्याय होणार नाही.
तर पुढे महराष्ट्र उपाध्यक्ष आण्णा रोकडे यांना विचारले असते ते म्हणाले,प्रल्हाद जाधव हे जिल्हाअध्यक्षाचे कर्तव्य पार पडत नाही.कल्याण –डोंबिवली आम्हाला पक्ष जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागेल.मेळावा घेऊन जाधव ऐवजी अंकुश गायकवाड यांना जिल्हाअध्यक्ष बनवायचे आहे.माजी महापौर रमेश जाधव,संदीप जाधव,उत्तम गवळी,विलास गायकवाड,मीना साळवे,माणिक उघडे,विकास खैरनार,दिनेश साळवी,समाधान तायडे,पाईकराव,दिलीप काकडे,तेजस जोंधळे, धम्मपाल सरकटे,चंद्रकांत बबलू, मंगेश कांबळे,राजू खिल्लारे,राजेश भालेराव,उमेश साळवे,वैशाली सावर्डेकर,तुकाराम पवार आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment