Header AD

कल्याणात आढळला रंग बदलण्यात माहीर असलेला दुर्मिळ 'शॅमेलीयन' सरडा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पश्चिमेतील गांधारी नजीक परिसरात एका घरामध्ये दुर्मिळ शॅमेलीयन प्रजातीचा सरडा आढळून आला. संबंधितानी वर्ल्ड रेस्क्यू हेल्पलाइनला ही माहिती दिली. यानंतर वॉर फौंडेशन या प्राणी मित्र संघटनेच्या कार्यकर्त्या फाल्गुनी दयाल यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन सरड्याला पकडले आणि नैसर्गिक अधिवासात सोडले. शॅमेलीयन ही दुर्मिळ प्रजात असून निसर्ग साखळीत त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. नामशेष होत चालली सरड्याची प्रजात कल्याणात आढळल्याने ही दुर्मिळ घटना असुन रंग बदलण्यात हे सरडे तरबेज असल्याचेही फाल्गुनी यांनी सांगितले.

     
किडे व फुलपाखरू असे प्रामुख्याने खाद्य असलेल्या या सरडा प्रजातीला चपळ समजले जात असले तरी हिरवा सरडा मात्र संथ व अलगद चालतो. गवताच्या रंगरूपात एकरूप होत असल्याने तो नजरेला येत नाही. त्वचेखाली असलेल्या रंगद्रव्यामुळे रंग बदलण्यात माहीर असणारा सरडा असे या प्रजातीला ओळखले जाते. वातावरणानुसार रंग बदलत जाणारे सरडे अनेक असले तरी हा हिरव्या रंगाचा सरडा दुर्मिळ समजला जातो.      
कल्याणात आढळला रंग बदलण्यात माहीर असलेला दुर्मिळ 'शॅमेलीयन' सरडा कल्याणात आढळला रंग बदलण्यात माहीर असलेला दुर्मिळ 'शॅमेलीयन' सरडा Reviewed by News1 Marathi on February 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads