Header AD

भिवंडीतील जलतरण पटूंचा जिल्हा परिषदेने केला सन्मान

 

भिवंडीतील जलतरणपटूंची दमदार कामगिरी ; ४२ किलोमीटरचे अंतर पोहून केले पार...


भिवंडी  , प्रतिनिधी  :  ठाणे  जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यासह महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी भिवंडीतील चिमुकल्या जलतरणपटूंनी केली. जलतरण स्विमिंग या क्षेत्रातील रिले ह्या क्रीडा प्रकारात सरवली गावातील कु.दक्ष आनंद भोईर आणि गोवे गावातील कु.हर्ष विकास पाटील, कु.धीरज निलेश पाटील आणि कुमारी सेजल विकास पाटील या १० वर्षाखालील चिमुकल्यांनी अलिबाग जवळील धरमतर खाडी ते गेट वे ऑफ इंडिया_ हे सागरी ४२ किलोमीटरचे अंतर १० तास २०  मिनिटांमध्ये पोहून पार केले. आज झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत याचारही जलतरणपटूचा संन्मान करण्यात आला.
 

यावेळी जिल्हा  परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) अजिंक्य पवार, सर्व सन्मानीय विषय समिती सभापती, सन्मानीय सदस्य यांनी या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंनी पहाटेची बोचरी थंडी आणि वेगाचे वारे अशी प्रतिकूल हवामान असतानाही हे अंतर  उत्कृष्ठरित्या पार केले. त्यांचे  मार्गदर्शक रविंद्र तरे  यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.

भिवंडीतील जलतरण पटूंचा जिल्हा परिषदेने केला सन्मान भिवंडीतील जलतरण पटूंचा जिल्हा परिषदेने केला सन्मान Reviewed by News1 Marathi on February 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads