रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांमुळे त्या प्रवासी महिलेला परत मिळाले १२ तोळे सोन्याचे दागिने ...
डोंबिवली , शंकर जाधव : डोंबिवलीतील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांमुळे प्रवासी महिलेला १२ तोळे सोन्याचे दागिने, ३ चांदीचे सिक्के आणि रोख १० हजार रुपये परत मिळाले. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे दागिने मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होते आहे. त्याच्या या कामाची दाखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनां शाबासकी द्यावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कल्याण येथील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या वर्षा प्रीतम राउत ( ३३ ) ह्या मंगळवारी लग्नासाठी ठाण्याला गेल्या होत्या. ठाण्यातून परत येत असताना सायंकाळी साडे वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्या.काही वेळाने त्याच्या लक्षात आले कि, आपण १२ तोळे सोन्याचे दागिने, ३ चांदीचे सिक्के आणि रोख १० हजार रुपये ठेवलेले बॅगेत लोकलमध्ये विसरलो. राउत यांनी १८२ या रेल्वेच्या हेल्पलीन नंबरवर फोन करून घडलेला प्रकार सांगितला.तसेच कल्याण रेल्वे स्टेशन उपप्रबंधक विनोद मिश्रा यांनाही माहिती दिली.
मिश्रा यांनी डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात या प्रकार कळविला. डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचे वपोनि हरफुल सिंह यादव यांनी उपनिरीक्षक आदेश कुमार, प्रधान आरक्षक किशोर येलने यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ठाकुर्ली रेल्वे स्थानकात धाव घेतली. राउत या ज्या लोकलमधून प्रवास करत होत्या ती लोकल ठाकुर्ली रेल्वे स्थानकात आल्यावर लोकलचे डब्बे तपासले.एका डब्ब्यात महिलेची बॅग सापडली. या बॅगेत १२ तोळे सोन्याचे दागिने, ३ चांदीचे सिक्के आणि रोख १० हजार रुपये असल्याचे दिसले.रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी सापडलेली बॅग डोंबिवली रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात आणली याची माहिती वर्षा राउत यांना सुपूर्त केली.

Post a Comment