भिवंडी कोनगाव पोलीस ठाण्यात बेवारस दुचाकींचा लिलाव
भिवंडी : दि.१६ (प्रतिनिधी ) भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बेवारस दुचाकी पोलीस ठाणे परिसरात भंगार होऊन पफुं राहिल्या असून या वाहनांची व्हीलेवाट लावण्या संदर्भात पोलीस आयुक्त यांच्या कडून आदेश प्राप्त होताच शांतीनगर पोलीसांनी १९ वाहनांचा लिलाव केला असून त्या नंतर २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कोनगाव पोलीस ठाण्यात जमा असलेल्या २५ बेवारस दुचाकी व १ महिंद्रा जीप अशा एकूण २६ वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिली आहे या सर्व वाहनांचे मूल्यांकन ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यलयाने निश्चित केले असून या लिलावातून येणारी रक्कम शासन जमा केली जाणार आहे .
भिवंडी कोनगाव पोलीस ठाण्यात बेवारस दुचाकींचा लिलाव
Reviewed by News1 Marathi
on
February 16, 2021
Rating:

Post a Comment