Header AD

आरएसपी युनिटच्या सहकार्याने स्वधा फाउंडेशन तर्फे वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : ३२ व्या रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत आरएसपी युनिट व स्वधा फाउंडेशनच्या  वतीने मुरबाड येथे एम.आय.डि.सी. हॉलमध्ये मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे  यांच्या अध्यक्षतेखाली आरएसपी ठाणे जिल्हा कमांडर मनीलाल शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाडमधील वाहन चालकांसाठी मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.     


          राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत स्वधा फाउंडेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर इव्हा अथाविया यांच्यातर्फे  रोड सेफ्टी मंथच्या  माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुरबाड येथे   रिक्षा चालकजीपचालक व बस चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी २०० ते २५० वाहनचालकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी पोलीस  निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी या उपक्रमाबाबत आर एस पी टीमचे व स्वधा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले व वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून आपली व परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहेलेन कटिंग करून अपघाताला आमंत्रण देऊ नये असे आवाहन केले.


आरएसपी कमांडर मनिलाल शिंपी यांनी यावेळी बोलताना सांगितले की समाजातील प्रत्येक नागरिकाने वाहन चालवताना नियम पाळणे आद्य कर्तव्य समजावे आणि आपल्या सोबत इतरांनाही वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जागृत करावे व १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये असे आवाहन केले. 


आरएसपी युनिटच्या सहकार्याने स्वधा फाउंडेशन तर्फे वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप आरएसपी युनिटच्या सहकार्याने स्वधा फाउंडेशन तर्फे वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप Reviewed by News1 Marathi on February 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads