Header AD

वीटभ ट्टीवरील नागरिकांसाठी दंत चिकित्सा जय फाऊंडेशन आणि टीम परिवर्तनचा पुढाकार

 


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : पडघा येथील करंजोटी आणि परिसरातील वीटभट्टीवरील नागरिकांसाठी नुकताच जय फाउंडेशन आणि टीम परिवर्तन या संस्थांच्या प्रयत्नांतून अनोखा दंतचिकित्सा कार्यक्रम घेण्यात आला. कल्याण येथील दंत चिकित्सक नेहा डोंगरे खडकबाण यांनी यावेळीं जमलेल्या सर्व मुलांची आणि नागरिकांच्या दातांची तपासणी केली.


लहान मुलांनी प्रामुख्याने आपल्या दातांची काळजी कशी घ्यावीदिवसांतून किती वेळा दात घासावेत आणि कशा पद्धतीने घासावेत यांची प्रात्यक्षिके यावेळीं मुलांना समजावून सांगण्यात आले. या दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन टीम परिवर्तनच्या माध्यमाने करण्यात आले होते. टीम परिवर्तनचे तुषार वारंगभुषण राजेशिर्केअविनाश पाटील त्याचबरोबर जय फाउंडेशनचे जय शृंगारपुरेसत्यजित गायकवाड आणि तेजस पटेल यावेळीं उपस्थित होते. दंतचिकित्सा शिबिरात ५०० पेक्षा अधिक लोकांना पेस्ट आणि ब्रशचे वाटप यावेळीं करण्यात आले.


 लहान मुलांना बिस्कीट आणि महिलांना साडी वाटप देखील यावेळीं करण्यात आले. दात घासण्यासाठी मुलांनी ब्रश आणि पेस्टशिवाय इतर कोणत्याही साहित्याचा वापर करू नये हा सल्ला देखील उपस्थित मंडळींना यावेळीं देण्यात आला. दंतचिकित्सा शिबिरासाठी लागणारे साहित्य महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या मदतीने उपलब्ध झाले. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना मौखिक स्वच्छता आणि चांगल्या आरोग्यासाठी दातांची निगा राखणे का गरजेचे आहे यांची माहिती देखील नेहा डोंगरे यांनी यावेळीं उपस्थितांना दिली.

वीटभ ट्टीवरील नागरिकांसाठी दंत चिकित्सा जय फाऊंडेशन आणि टीम परिवर्तनचा पुढाकार वीटभ ट्टीवरील नागरिकांसाठी दंत चिकित्सा जय फाऊंडेशन आणि टीम परिवर्तनचा पुढाकार Reviewed by News1 Marathi on February 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads