कल्याण रेल्वे स्टेशन मध्ये साडेपाच फुटी लांब साप आढळल्याने रेल्वे प्रवाशांची उडाली भांबोरी
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण रेल्वे स्थानकातील प्लाँटफार्म क्रमांक १ लगत साप आढळल्याने रेल्वे प्रवाशांची भांंबोरी उडल्याची घटना घडली आहे. कल्याण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एक च्या बाजूला शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास एक साडे पाचफुटी साप आढळल्याने रेल्वे प्रवाशांची भांबोरी उडाली. अशा प्रसंगी काही हौसी रेल्वे प्रवासी सापाचा व्हिडिओ काढण्यात मग्न झाले होते.
समयसूचकता दाखवित रेल्वे पी एस् आय् पवार रेल्वे पोलीस साळवे यांनी तातडीने सर्पमित्र दत्ता बोंबे यांना काँँल् करून घटनास्थळी बोलविले. सर्पमित्र दत्ता बोंबे, हितेश करंजगावकर यांनी तातडीने घटनास्थळी पोहचत सिमेंट ब्लाँक खाली दबा धरून बसलेल्या साडेपाच फुटी लांब घोणस प्रजातीच्या सापाला पकडल्याने उपस्थितीतांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्र दत्ता बोंबे हितेश करंजगावकर यांनी बिनविषारी असलेल्या या घोणस सापास वनपाल एम् डी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक आधिवासात सोडत जीवनदान दिले.
"प्लाँटफार्मलगत घोणस ही तिच्या भक्ष्यांच्या उंदीर घुशी यांच्या शोधामुळे आली असावी असे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले."
कल्याण रेल्वे स्टेशन मध्ये साडेपाच फुटी लांब साप आढळल्याने रेल्वे प्रवाशांची उडाली भांबोरी
Reviewed by News1 Marathi
on
February 14, 2021
Rating:

Post a Comment