Header AD

भिवंडीत पोलीस तुमच्या दारी, तुमचे संरक्षण आमची जबाबदारी या उपक्रमाची सुरुवात

भिवंडी दि. २० (प्रतिनिधी ) भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी
ठाणे पोलिस आयुक्त यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये शहरातील वाहतूक कोंडी, नशेच्या पदार्थांची अवैध विक्री, नकली व एक्सपायरी संपलेल्या अन्न पदार्थांची विक्री तसेच भिवंडीतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता महिला सुरक्षा या विषयांबाबत तात्काळ कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे आ.रईस शेख यांनी केलेल्या मागणीनुसार शुक्रवारी शिवजयंतीचे औचित्य साधून शांती नगर पोलिस ठाणे हद्दीतील नुरीनगर पहाडी, गणेश मंदिर जवळ वार्ड क्रमांक ३ या ठिकाणी शांतीनगर पोलिस ठाण्याच्या वतीने पोलीस तुमच्या दारी, तुमचे संरक्षण आमची जबाबदारी या उपक्रमा अंतर्गत परिसरातील महिलांची बैठक घेण्यात आली.  
               
                  
                सदर बैठकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी महिलांनी आपल्या मुलांना शिक्षण देणेकरीता प्रथम प्राधान्य देण्यात यावे महिला व मुलींवर अत्याचार होत असल्यास कोणतीही भीती मनात न बाळगता महीलांनी तक्रार देण्यास पुढाकार घ्यावा, आपले परिसरात जर कोणी महिलांची छेडछाड करीत असेल किंवा नशा करून महिलांना त्रास देत असल्यास त्याबाबत आपण महिला पोलिस अधिकारी फडतरे व जाधव यांना संपर्क करावा त्याकरिता उपस्थितांना महिला अधिकारी यांचे मोबाईल नंबर देखील देण्यात आले. तसेच  परिसरातील बेकायदेशीर नशेचे पदार्थ विक्री करणारे तसेच महिलांची छेडछाड करणारे लोकांबाबत माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल याची त्यांना शाश्वती देण्यात आली.             आपल्या परिसरात जर कोणी बेकायदेशीररित्या नशेचे पदार्थ विक्री करत असल्यासचे निदर्शनास आल्यास आपण तात्काळ पोलीस ठाणेशी संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले तसेच करोनाचा वाढता प्रभाव पाहता लोकांनी स्वतःची तसेच आपले कुटुंबीयांची काळजी घ्यावी मास्कचा सतत वापर करावा, साबणाने हात वारंवार धूवावे, सँनीटायझरचा वापर करावा तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे या व इतर सूचना देण्यात आल्या. सदर बैठकी करिता शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्यासह महिला सपोनि फडतरे, पोउनि जाधव व परिसरातील तब्बल ८० ते १०० महिला व पुरुष उपस्थित होते.
भिवंडीत पोलीस तुमच्या दारी, तुमचे संरक्षण आमची जबाबदारी या उपक्रमाची सुरुवात भिवंडीत पोलीस तुमच्या दारी, तुमचे संरक्षण आमची जबाबदारी या उपक्रमाची सुरुवात Reviewed by News1 Marathi on February 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads