Header AD

भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावातील अग्निमाता मंदिरातील दानपेटी फोडून चोरी,





भिवंडी : दि.२२ (प्रतिनिधी ) भिवंडी परिसरात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चोरीच्या घटनात वाढ होत असताना आता चोरट्यांनी थेट मंदिराच्या 
दानपेटीना आपले लक्ष केल्याचे समोर आले आहे .
भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावातील अग्निमाता मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी उचलून बाहेर आणून दानपेटी फोडून त्यामधील पैसे चोरून आरोपी फरार झाले आहेत. यांची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे .


         सदर मंदिराची दानपेटी वर्षातून एकदा यात्रे प्रसंगी उघडली जात असल्याने मागील वर्षी दानपेटीत ५० हजार रुपये भक्तांनी जमा केले होते .यंदा यात्रा अजून दोन महिन्यावर असताना ही दानपेटी फोडून त्यामधील रक्कम चोरट्याने पळविली असल्याचे गावचे पोलीस पाटील अशोक जाधव यांनी सांगत पोलीस पाटील, सरपंच व  स्थानिक ग्रामस्थ यांनी चोरट्यांना लवकरात लवकर पकडून  कडक कारवाई करण्याची पोलिसांकडे मागणी केली आहे...
भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावातील अग्निमाता मंदिरातील दानपेटी फोडून चोरी, भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावातील अग्निमाता मंदिरातील दानपेटी फोडून चोरी, Reviewed by News1 Marathi on February 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे कारागृहात उभारणार क्रांति कारकांचे स्मारक

■ जिल्हाधिकारी, कारागृह, सार्वजनिक बांधकाम प्रशासना सह आमदार संजय केळकर यांचा पाहणी दौरा... ठाणे , प्रतिनिधी : ऐतिहासिक ठाण्याचे मानबिन्दू अ...

Post AD

home ads