युनियन बँकेच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत कर्जाचे वाटप
ठाणे, दि. 27 - युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या ठाणे शाखेच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत तब्बल 400 ग्राहकांना नुकतेच कर्जाचे वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत या बॅंकेच्या माध्यमातून आतार्पयत 2000 हून अधिक नागरीकांना कर्ज वाटप केले आहे. तसेच येत्या काही दिवसांत आणखी 1 हजाराहून अधिक नागरीकांना या योजनेचा लाभ देण्याचा बॅंकेचा मनोदय आहे.
या कर्ज वाटपाच्या निमित्ताने युनियन बॅंकेचे मुंबई कार्यालयाचे मुख्य प्रबंधक व्यंकटेश मुच्छल, रेणु के. नायर (क्षेत्र प्रमुख, मुंबई) यांच्यासह 200 लाभार्थ्यांनी यावेळी उपस्थिती लावली होती. याचे आयोजन येत्या 6 मार्च आणि 13 मार्च रोजी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
भारत सरकारच्या सर्व योजनांच्या युनियन बॅंकेने आपला महत्वाचा वाटा उचलला आहे. तसेच भविष्यातही असेच योगदान दिले जाईल असे आश्वासन बॅंकेच्या वतीने देण्यात आले आहे. सध्याच्या काळात सर्वसामान्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. परंतु अशा नागरीकांसाठी बॅंकेच्या माध्यमातून छोटे तसेच गरीब व्यापाऱयांसाठी मदत करण्याचा बॅंकेचा उद्देश असल्याचे व्यंकटेश मुच्छल यांनी सांगितले.
हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून बॅंकेच्या ठाणे शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच भविष्यातही समाजातील प्रत्येक घटकासाठी बॅंकेच्या माध्यमातून वित्तय सहाय्य दिले जाईल असेही आश्वासन त्यांनी दिले. तर युनियन बॅंकेचा उद्देश बॅंकींग करतांना जनसेवा करणे हा देखील उद्देश असल्याचे रेणु नायर यांनी सांगितले. त्यातून प्रत्येकाला बॅंकेच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. विशेषकरुन मध्यम आणि अल्प मध्यम नागरीकांपर्यंत पोहचून त्यांना या योजनांचा लाभ देण्याचाही आमचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment