Header AD

भक्तीभाव व समर्पणाने निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी

 कल्याण , कुणाल म्हात्रे : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली महाराष्ट्राचा ५४वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २६, २७ व २८ फेब्रुवारी२०२१ रोजी व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण अजूनही पूर्णपणे थांबलेले नाही ही बाब लक्षात घेऊन भारत सरकारने कोविड-१९ च्या संदर्भात जारी केलेल्या दिशा-निर्देशांना अनुसरुन समागमाचे आयोजन व्हर्च्युअल रूपात करण्यात येत आहे.


      मिशनच्या सेवादारांकडून मागील दिड महिन्यापासून या संत समागमाची जय्यत पूर्वतयारी मोठ्या भक्तीभावाने व समर्पणाने संत निरंकारी सत्संग भवनचेंबूरमुंबई येथे केली जात आहे. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात समागमात भाग घेणारे वक्तागीतकारगायककविसंगीतकार तसेच वादक यांनी अगोदरच या भवनमध्ये येऊन आपल्या प्रस्तुती सादर केलेल्या असून व्हर्च्युअल रूपात प्रसारण करण्यासाठी त्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागातील तसेच जवळपासच्या राज्यातील आणि देश-विदेशातील कित्येक वक्त्यांनी या समागमामध्ये भाग घेतला आहे.


      समागमाच्या पूर्वतयारी दरम्यान कोविड-१९ संदर्भात सरकारकडून देण्यात आलेल्या दिशा-निर्देशानुसार सोशल डिस्टंसिंगमास्क परिधान करणे (दोन गजाचे अंतरमास्क घालणे जरुर)सॅनिटाईजेशन इत्यादि काळजी घेण्याबरोबरच समागम सेवांमध्ये संलग्न आणि कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या सर्व प्रतिनिधींची कोविड  चाचणीही करण्यात आली जेणेकरुन सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे.


      मिशनच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहेकी यावर्षी ५४वा वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित केला जात आहे. निरंकार प्रभुच्या इच्छेला सर्वोपरी मानत हर्षोल्लासाने भक्तगण याचा स्वीकार करत आहेत. संपूर्ण समागमाचे व्हर्च्युअल प्रसारण मिशनच्या वेबसाईटवर दिनांक २६२७ व २८ फेब्रुवारी२०२१ रोजी प्रस्तुत करण्यात येईल. याशिवाय, हा समागम संस्कार टी.वी. चनलवर तिन्ही दिवशी सायंकाळी ५ ते रात्री ९  वाजेपर्यंत प्रसारित केला जाईल. 

भक्तीभाव व समर्पणाने निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी भक्तीभाव व समर्पणाने निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी Reviewed by News1 Marathi on February 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads