Header AD

कोरोनाच्या वाढत्या संख्ये मुळे शिवसेना महिला आघाडीचा भव्य हळदी कुंकू कार्यक्रम रद्द


■ऑनलाइन कार्यक्रमात महिलांनी घरीच राहून सहकार्य करण्याचे  शिवसेना महिला आघाडीचे आवाहन...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  गेल्या दोन दिवसापासून कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची  संख्या वाढल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले असुन  पुन्हा एकदा विविध उपाय योजना महापालिकेने सुरू केल्यात. मास्क वापरण्यासह, कार्यक्रमासाठी गर्दी न करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीतर्फे कल्याण पश्चिमेतील  बेतूरकर पाडा येथे आयोजित हळदि कुंकू कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीन होणार असल्याची माहिती महिला जिल्हा संघटक विजया पोटे यांनी केले आहे.


या कार्यक्रमातील बक्षिसेतसेच महिलांना वाण घरपोच देण्यात येत आहेत. नागरिकांना वाण सोबत सॅनिटायझर, मास्क वाटप करत कोरोनाचे नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कल्याण जिल्हा शिवसेना महिला संघटक विजया पोटे यांनी मुख्यमंत्री उदध्व ठाकरे यांच्या कोरोना पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहानानुसार,  कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी मनपा प्रशासनाच्या कोरोना नियमांची अमंलबजावणीसाठी  नागरिकांनी प्रशासनाला शासनाला सहकार्य करावे. घरी राहून स्वतः सोबत इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच कुठेही गर्दी न करता नियमांचे पालन करावे असे आवाहन विजया पोटे यांनी केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संख्ये मुळे शिवसेना महिला आघाडीचा भव्य हळदी कुंकू कार्यक्रम रद्द कोरोनाच्या वाढत्या संख्ये मुळे शिवसेना महिला आघाडीचा भव्य हळदी कुंकू कार्यक्रम रद्द Reviewed by News1 Marathi on February 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads