भिवंडीत स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करण्याची मागणी...
भिवंडी :दि.१३ (प्रतिनिधी ) भिवंडी शहर व ग्रामीण भागात वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता भिवंडी शहरात स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणी कडे व्यक्तिशः लक्ष द्यावे अशी मागणी शिवसैनिकां कडून होत आहे .
भिवंडी शहरातील वाहन नोंदणी व परवाना व इतर कामे ही ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत केली जात असून पूर्वी चाविंद्रा या ठिकाणी आठवड्यातून दोन दिवस आरटीओ शिबिर लागत असे परंतु जागा नसल्याने मागील कित्येक दिवसां पासून ते ही बंद असल्याने भिवंडी शहरातील नागरीकांना आरटीओ संबंधित कामांसाठी ठाणे कार्यालयात जावे लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे .तर शहरात मागील वर्षभरापासून आरटीओ अधिकारी न फिरकल्याने शहरात अनधिकृत रिक्षा, खाजगी बस यांचा सुळसुळाट झाला असून या खाजगी बस रस्त्यावर बिनदिक्कत पणे उभ्या करून ठेवल्याने नागरीकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे .
तर शहरात बिगर परवाना रिक्षा अल्पवयीन मुले चालवीत असल्याने अनेक अपघात होत असतानाच या मुजोर रिक्षाचालकांकडून उद्धट पणाचे वर्तन व मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्याच्या स्थितीत शहरात अधिकृत व अनधिकृत अशा मिळून सुमारे १५ हजार रिक्षा रस्त्यावर फिरत असल्याने पादचारी नागरीकांच्या अपघाताचे प्रमाण वाढत आहे .शहरात ठिकठिकाणी अवैध रिक्षा स्टॅण्ड सुरू केल्याने या रिक्षा रस्ते अडवून उभ्या केल्याने वाहतूक कोंडी होत आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात आरटीओ चे स्वतंत्र कार्यालय सुरू करावे अशी मागणी वाढत आहे .
भिवंडीत स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करण्याची मागणी...
Reviewed by News1 Marathi
on
February 13, 2021
Rating:

Post a Comment