Header AD

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कामगारांना न्याय मिळवून देणार एनआरसी कामगारांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन


                 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :-  आंबिवली स्टेशन नजीक रेयॉन उत्पादनात अग्रेसर असलेली अशिया खंडातील नामवंत एनआरसी कंपनी बंद झाल्यानंतर मागील १२ वर्षापासून कामगाराचा आपल्या हक्काच्या देण्यासाठी लढा सुरु असून आता कंपनी प्रशासनाने कंपनीची जागा अदानी समूहाला विकली आहे. मात्र कामगारांना त्यांच्या हक्काची देणी मिळालेली नसल्यामुळे कामगाराचे अनेक दिवसापासून आंदोलन सुरु आहे. शनिवारी या आंदोलनकर्त्या कामगाराच्या कुटुंबियाची आंदोलनस्थळी भेट घेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्याशी या प्रकरणी चर्चा करून तोडगा काढण्याचे मात्र कोणत्याही परिस्थितीत कामगारावर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले. 


कामगाराच्या देण्याचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. एनआरसी कंपनी बंद झाल्यानंतर कामगारांना हक्काच्या देण्याची प्रतीक्षा असून आपल्याला आपली हक्काची देणी मिळाल्या खेरीज या जागेवरील बांधकाम  पाडकाम केले जाऊ नये यासाठी कामगाराचे आंदोलन सुरु आहे. मात्र पोलीस दबावाने आपले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा कामगाराचा आरोप आहे. याप्रकरणीच्या खटल्यात ट्रीब्युनलकडून  कामगारांना ३६ कोटी रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र कामगारांना हि रक्कम मान्य नसून ४५०० कामगारांना किमान २५०० कोटी रक्कम मिळालीच पाहिजे या मागणीवर कामगार ठाम आहेत. यामुळेच कामगारांनी आपल्या हक्काच्या देण्यासाठी  आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलन कर्त्यांची शनिवारी पालक मंत्र्याशी आमदार विश्वनाथ भोईर यांनी भेट घडवून आणली. यावेळी कामगारांनी आपला आक्रोश व्यक्त केला.   जोपर्यत आपली देणी मिळत नाहीत तोपर्यत हि कारवाई थांबविण्याची मागणी कामगाराकडून करण्यात आली.  तसेच पोलिसाच्या मदतीने अदानी समूह आपल्याला जबरदस्तीने बेघर करत असून राज्य शासनाने यात हस्तक्षेप करत कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी कामगारांनी केली.  


दरम्यान पालकमंत्र्यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यासबोत लवकरच चर्चा करत न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना त्यांच्या हक्काची देणी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कामगारांना न्याय मिळवून देणार एनआरसी कामगारांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कामगारांना न्याय मिळवून देणार  एनआरसी कामगारांना  पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांचे आश्वासन    Reviewed by News1 Marathi on February 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads