Header AD

लग्न वरातीत सोशल डिस्टन्स सिंगचा फज्जा

  डोंबिवली ( शंकर जाधव ) एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला असताना दुसरीकडे मात्र डोंबिवली पूर्वेकडील प्रसिद्ध असलेल्या फडके रस्त्यावर एका लग्नाच्या मिरवणुकीत सोशल डिस्टन्ससिंगचा फज्जा उडाल्याचे पाहवयास मिळाले.           मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन करत लॉकडाऊन नको  असेल तर नियमांचे पालन करा असे सांगितले होते. मात्र डोंबिवलीतील या वरातीने कोरोना चे आम्हाला भय नाही या आविर्भावात सर्व नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले.  या वरातिने पालिका प्रशासनाला एकप्रकारे आव्हान केल्याचे दिसून आले.     

        त्यामुळे अशा वरतीवर प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून का कारवाई होत नाही असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे. सुरुवातीला देखील एका लग्नाच्या हळदीमध्ये डोंबिवली शहरात कोरोनाचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता.त्यामुळे आता  तरी प्रशासन जागे होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लग्न वरातीत सोशल डिस्टन्स सिंगचा फज्जा लग्न वरातीत सोशल डिस्टन्स सिंगचा फज्जा Reviewed by News1 Marathi on February 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads