Header AD

वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून कोरोना योद्ध्यांचा सन्मान करावा खासदार कपिल पाटील यांचे आवाहन...

 

भिवंडी, दि. २८ (प्रतिनिधी) :  माझ्या ५ मार्च रोजी येणाऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून माझी भेट न घेता, आपल्या परिसरातील कोरोना योद्ध्यांचा घरी जाऊन सत्कार करावा, अशी सुचना भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी केले आहे खासदार कपिल पाटील यांचा ५ मार्च रोजी वाढदिवस आहे. या दिवशी ठाणे व पालघर जिल्ह्यातील राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रासह विविध मान्यवरांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला जातो. त्यानमित्ताने जिल्ह्यात सर्व स्तरातील नागरिकांचे संमेलन भरते. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासदार कपिल पाटील यांनी आपला वाढदिवस जाहीरपणे साजरा न करण्याचे ठरविले आहे. वाढदिवसाला माझी प्रत्यक्ष भेट न घेताआपल्या भागातील कोरोना योद्धे डॉक्टर, नर्स यांच्यासह आरोग्य सेवेतील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पोलिस, रुग्ण सर्वेक्षणाच्या कामात सहभागी झालेले शिक्षक, स्वच्छता कर्मचारी, सरकारी अधिकारी यांचा घरी जाऊन सन्मान करावा. 


तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या कोरोना योद्ध्यांना जीवनावश्यक वस्तू देऊन गौरव करावा. आपण केलेले हे कार्य याच माझ्यासाठी सर्वोत्तम शुभेच्छा आहेत. कोरोना योद्ध्यांची भेट व गौरव म्हणजेच माझा सन्मान, अशा शब्दांत खासदार कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांसह नागरिकांना आवाहन केले आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून कोरोना योद्ध्यांचा सन्मान करावा खासदार कपिल पाटील यांचे आवाहन... वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून कोरोना योद्ध्यांचा सन्मान करावा खासदार कपिल पाटील यांचे आवाहन... Reviewed by News1 Marathi on February 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads