Header AD

भिवंडीत ४० लाखांचा गुटखा जप्त

 
भिवंडी , प्रतिनिधी  :   भिवंडी परिमंफल क्षेत्रात पानपट्टी वर मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री केला जात असताना अन्न व औषध प्रशासन यास आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असून नुकताच गुजरात येथून कंटेनर च्या माध्यमातून विक्री साठी आणलेला तब्बल ४० लाख रुपये किमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे .


          अन्न व औषध प्रशासनाचे भिवंडी परिक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांना आपल्या बतमीदारा मार्फत गुजरात हुन वाडा मार्गे एक कंटेनर भिवंडी परिसरात गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्या वर अन्न अधिकारी माणिक जाधव ,शंकर राठोड ,मनीष सानप,अरविंद खडके या पथकाने भिवंडी वाडा रस्त्यावर पाळत ठेवून कंटेनर हा शेलार येथे आला असता त्या ठिकाणी वरील पथकाने त्यास अडवून कंटेनर मधील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये १०० गोणीं मध्ये विमल गुटखा हा तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे आढळून आले .या कंटेनर चा चालक अर्जुन भीमराव गोयेकर यास ताब्यात घेऊन भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अन्न अधिकारी माणिक जाधव यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


          अन्न व औषध विभागाच्या भिवंडी परिक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऑक्टोबर २०१९ पासून आज पर्यंत विविध ठिकाणी कारवाई करीत तब्बल ११ कोटी ८० लाख रुपयांचा गुटखा पकडून या विभागातील या व्यवसायात असलेल्या माफियांचे रॅकेट उध्वस्त करीत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाची कामगिरी केली 
भिवंडीत ४० लाखांचा गुटखा जप्त भिवंडीत ४० लाखांचा गुटखा जप्त Reviewed by News1 Marathi on February 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads