Header AD

भिवंडीत वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपचे निदर्शने

 भिवंडी दि. २७ (प्रतिनिधी ) राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. राज्यात ठीक ठिकाणी आंदोलन सुरू असतानाच शनिवारी भिवंडीतील धामणकर नाका परिसरात भाजपच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख मानसी राजे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. 


यावेळी आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय. ठाकरे सरकारने राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा भाजप महिला मोर्चाकडून देण्यात आलाय. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भिवंडीत वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपचे निदर्शने  भिवंडीत वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपचे निदर्शने Reviewed by News1 Marathi on February 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads