राष्ट्र कल्याण पार्टीच्या वतीने प्रॉपर्टी कार्डबाबत जनजागृती
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक नागरिकांच्या हक्काच्या प्रॉपर्टीवर अनधिकृत बांधकामाचा शिक्का असून हा अनधिकृततेचा शिक्का दूर करण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड आवश्यक असून या प्रॉपर्टी कार्ड बाबत राष्ट्र कल्याण पार्टीच्या वतीने कल्याण डोंबिवलीकरांमध्ये जनजागृती केली जात आहे. राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर यांच्या माध्यमातून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
वर्षानुवर्षे राहत असलेल्या कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या हक्काच्या प्रॉपर्टीवर अनधिकृत बांधकामाचा शिक्का आहे. हा अनधिकृततेच शिक्का दूर करण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड आवश्यक आहे. नागरिकांना याबाबत पुरेसे ज्ञान नसल्याने अनेकवेळा अनधिकृत बांधकाम म्हणून होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागते. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मालकी हक्काचा प्रथमदर्शनी पुरावा असून कोणत्याही नैसर्गिक संकट व विकास योजनांच्या वेळी शासकीय मोबदला मिळविण्यासाठी प्रॉपर्टीच्या हक्काचा पुरावा आहे. जागा पुर्नविकासामध्ये गेल्यास त्याचा मो बदला मिळणे सहज शक्य होते.

Post a Comment