Header AD

पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भाजी मार्केट आणि दुकानांमध्ये अचानक भेट
कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज अचानक कल्याण पश्चिम येथे रेल्वेस्थानका लगतच्या भाजी मंडई आणि तेथील दुकानांत भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. भाजी मंडई मध्ये नागरिकांना, विक्रेत्यांना मास्क  परिधान करणेबाबत सूचना दिल्या.


महापालिका क्षेत्रात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठी मार्केट परिसरात नागरिक,विक्रेते मास्क वापरतात की नाही याची पाहणी करण्यासाठी मार्केटला अचानक भेट दिली असे त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी महापालिकेने  पथक नेमले असून हे पथक दररोज मास्क परिधान न करणाऱ्या लोकांविरुद्ध दंडनीय कारवाई करणार आहे, त्याचप्रमाणे मॅरेज हॉल व समारंभाच्या ठिकाणी पाहणी करुन नियम भंग केलेला आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.


    नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये, सोशल डिस्टंसिंग पाळावे, वयोवृद्ध नागरिकांनी शक्यतोवर घराबाहेर पडू नयेकोविडचा सामना ९ ते १० महिने चांगल्या रीतीने केला आहे आता नागरिकांनीदुकानदारांनी स्वतः खबरदारी घ्यावी आणि आपली जबाबदारी ओळखून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवारमहापालिका सचिव संजय जाधवक प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरेसहा.जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे इ. अधिकारी वर्ग त्यांच्या समवेत होता.


पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भाजी मार्केट आणि दुकानांमध्ये अचानक भेट पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भाजी मार्केट आणि दुकानांमध्ये अचानक भेट  Reviewed by News1 Marathi on February 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads