Header AD

डोंबिवलीत वाढताय मधुमेह, हृदयरोग आणि त्वचारोग रुग्णांची संख्या...

 

 

भाजपाच्या आरोग्य शिबीरातून माहिती आली समोर...


 

डोंबिवली , शंकर जाधव : खेडेगावाचे शहर झालेल्या डोंबिवली शहर हे धावपळीच्या स्पर्धेत आहे. येथील नागरिकांची जीवनशैली बदलली आहे. याचा परिमाण आरोग्यावर झाल्याने मधुमेह, हृदयरोग आणि त्वचारोग रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे अशी धक्कादायक माहिती डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या आरोग्य शिबिरात समोर आली.भारतीय जनता पार्टी निळजे लोढा पलावा शहआरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनतेरणा स्पेशालिटी हॉस्पीटल अॅण्ड रिसर्च सेंटरमहावीर रुग्णालय डोंबिवली व गायत्री पॅथॉलॉजी लॅब उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते.भारतीय जनता पार्टी डोंबिवली ग्रामीणचे सरचिटणीस रविंद्र पाटील, आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, भारतीय जनता पार्टी निळजे लोढा पलावा शहर अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील यांच्या प्रयत्नाने सदर शिबीर पार पडले.या शिबीराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पाचशेहून अधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. या शिबीरात बी.पी. शुगर तपासणीई.सी.जी. तपासणी,हाडांतील कॅल्शियम तपासणीदंतचिकित्सानेत्रतपासणीअल्पदरात चष्मा वाटपडॉक्टरांकडून सल्ला आणि मोफत ठराविक औषधे उपलब्ध करून देण्यात आली. सामान्य रूग्णतपासणी विभाग ही याठिकाणी ठेवण्यात आला होता. या शिबीराचे उद्घाटन माजी मंत्री जगन्नाथ पाटीलभाजपा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटीलउल्हासनगर बाजार समितीचे सभापती राजेंद्र वारेमहेंद्र पाटीलवसंत पाटीलब्रह्मा माळीमोहन पाटीलसाजन म्हात्रेसतीश सिंगचंद्रकांत शिंदेअजित सिंगजयेंद्र पाटीलसदाशिव मालप्पाकरूणा पाटीलआशा बोराडेमंजू जैनप्रदीप बोनलविवेक चौबे आदी मान्यवर उपस्थित होते.या शिबिरात डॉ. अधिक लोखंडे आणि डॉ. अजित निळे म्हणाले, डोंबिवलीकरांची जीवनशैली बदलली आहे.भारतीय पद्धतीचे जेवण न जेवता फास्टफूडची चव,नियमित व्यायामाकडे लक्ष न देणे, वेळोवेळी तपासणी न करणे या कारणामुळे मधुमेह, हृदयरोग आणि त्वचारोग रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.नागरिकांमध्ये वयाच्या चाळीस वर्षानंतर हाडांमधील कॅल्शियम कमी होते. कॅल्शियम हा हाडांच्या आरोग्यांची देखभाल करण्यास मदत करते. ते स्नायूचे कार्य सुधारतेहदयाचे ताल मजबूत करतेरक्तप्रवाहात इतर खनिजांचा स्तर राखण्याचे काम करतात. कॅल्शियम वाढीसाठी नागरिकांना नैसर्गिकरीत्या डेअरी उत्पादनअन्नधान्यब्रोकोलीचे सेवन करावे असे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी रविंद्र पाटील म्हणालेया विभागातील लोकांना आरोग्याविषयक जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सातत्याने आरोग्यविषयक शिबीराचे आयोजन क रीत असतो. या विभागातील लोक तंदुरूस्त राहावी यासाठी मी माङया परीने प्रयत्न करीत असतो. या मोफत शिबीराच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतोअसे सांगितले. आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील म्हणालेया शिबारीत ज्या रूग्णांना मोठय़ा शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. त्यांना रविंद्र पाटील यांच्या कार्यालयाजवळ गाडीची व्यवस्था केली आहे. या रूग्णांना रुग्णालयात नेण्यात येणार आहेआरोग्य शिबीरात ८०  ते ९०  टक्के लोकांमध्ये हाडांमधील कॅल्शियमची कमतरता असल्याचे आढळून आले आहे.

डोंबिवलीत वाढताय मधुमेह, हृदयरोग आणि त्वचारोग रुग्णांची संख्या... डोंबिवलीत वाढताय मधुमेह, हृदयरोग आणि त्वचारोग रुग्णांची संख्या... Reviewed by News1 Marathi on February 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads