Header AD

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी नितीन शिंदे यांची तर सरचिटणीस पदी किशोर पाटील यांची बिनविरोध निवड

भिवंडी दीं 13 (प्रतिनिधी ) :- महाराष्ट्र राज्य  मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीची बैठकित   महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष  .वंसतराव मुडें यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ  आरोटे,यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली.यावेळी महाराष्ट्र राज्य प्रसिध्दि प्रमुख श्री.नवनाथ जाधव, राज्यमाध्यम सल्लागार .भगवान राऊत उपस्थित होते, या विशेष बैठकीत महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष .वंसतराव मुडें  व प्रदेश सरचिटणीस .विश्वासराव आरोटे,यांनी उपस्थित सर्व पत्रकारांच्या सहमतीने  कोकण विभागीय अध्यक्ष पदासाठी .नितींन मनोहर शिंदे यांची,तर कोकण विभागीय सरचिटणीस पदासाठी  भिवंडी तालुक्यातील अग्रगण्य दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक .किशोर बळीराम पाटील यांची बिनविरोध निवड  करून.प्रदेशाध्यक्ष श्री.वसंत मुंढे व राज्य सरचिटणीस श्री.विश्वासराव आरोटे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व सरचिटणीस यांचे शाळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. तसेच याच शुभ प्रसंगी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी मध्ये ॲड. रचना भालके यांची निवड करण्यात आली.यावेळी पालघर जिल्हा अध्यक्ष श्री.विकास पाटील, ठाणे शहर जिल्हा मुख्य कार्यकारिणी श्री.प्रकाश दळवी, श्री.मिलींद दाभोळकर, श्री.सतीशकुमार भावे, ज्योती चिदंरकर, श्री.अतुल तिवारी, श्री.मंगेश प्रभुळकर,श्री.संजय भोईर,श्री.मनोज कदम,श्री.आखिलेश पाल ,श्री. दिनकर गायकवाड,श्री.सुरजपाल यादव यासह आदी मान्यवर  पत्रकार उपस्थित होते.


पत्रकार म्हणजे समाजातील प्रश्नाबद्दल, लोकांच्या अन्याय आत्याचाराबद्दल जो अस्वस्थ होतो, कुठेतरी त्याच्या मनामध्ये वेदना होत असते तोच खरा पत्रकार असे म्हणायला वावग ठरू नये असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वंसतराव मुडें  यांनी  यावेळी सांगितले.कोरोना काळामध्ये अनेक पत्रकांराचा मुत्यू झाला तर कोरोना काळामध्ये अनेक पत्रकारांना कामावरून कमी केले गेले आहे. तसेच काही पत्रकारांचे वेतन निम्मे करण्यात आले आहे. तसेच कोरोना काळामध्ये वर्तमानपत्र कमी झाले.तर जाहीरातींचे प्रमाण कमी झाले या सगळ्या अडचणीचा फटका पत्रकारांना बसला आहे.त्यामुळे    पत्रकारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.तसेच औरंगाबाद मध्ये संपादकांची गोलमेज परिषद आयोजित करून वृत्तपत्र व्यवसायातील अडचणींवर चर्चाकरून मार्ग काढण्यात आला.वृत्तपत्र व्यवसाय टिकवण्यासाठी वृत्तपत्राची किमंत वाढवली पाहिजे हे पटवून दिले. त्यामुळे सांगली मराठवाड्यासह राज्यातील अनेक दैनिकांची किमंत वाढवली.पत्रकार संघ हा आपला कुटूंब आहे;पत्रकार संघटनेच्या माध्यमातून काय केले पाहिजे तसेच आपण ही संघटना अधिक सक्षम कशी करता येईल.व सर्वांमध्ये एकोपा चे संबंध कसे वाढवता येतील या विषयी चर्चा  केली .या बैठकीचे सूत्रसंचालन राज्यमाध्यम सल्लागार श्री.भगवान राऊत यांनी  केले .


यावेळी बैठकीस पत्रकार संघाचे मिनल पवार,श्री.सुभाष शांताराम जैन, श्री.सतीश कुदंळे, श्री.अभिषेक चव्हाण, श्री.अमित गुजर,श्री. ख्वाजा शेख, श्री.गणेश गव्हाणे,श्री.सुबोध कांबळे,श्री.नरेंद्र गुप्ता, श्री.देवेंद्र शिंदे  व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.कोणतेही काम असेल तर आपण सर्वांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे .जेणे करुन प्रत्येकाचे मत आपल्याला समजेल.व आपण सर्वांनी आम्हा दोघांची बिनविरोध निवड केल्या बद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो व असेच सहकार्य यापुढे ही आम्हाला कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे यावेळी कोकण विभागीय नवनिर्वाचित सरचिटणीस श्किशोर पाटील यांनी सांगितले.या  कोकण विभागात ठाणे,पालघर,नवीमुंबई, रायगड व पुणे अशा पाच जिल्ह्याचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी नितीन शिंदे यांची तर सरचिटणीस पदी किशोर पाटील यांची बिनविरोध निवड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी नितीन  शिंदे यांची तर सरचिटणीस पदी किशोर पाटील यांची बिनविरोध निवड Reviewed by News1 Marathi on February 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads