Header AD

भिवंडीत गोदाम दुर्घटनेत मृतांची संख्या दोन गोदाम मालकांसह विकासकावर गुन्हा दाखल
भिवंडी ,  प्रतिनिधी  :  भिवंडी तालुक्यातील दापोडे ग्रामपंचायत क्षेत्रातील हरिहर कंपाऊंड येथे  काळ सकाळी एक मजली गोदाम इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्या खालून तब्बल सात तासांनी जखमी अवस्थेत बाहेर काढलेल्या ऋतिक सुरेश पाटील वय १९ रा.डुंगे याची ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली असून या दुर्घटनेत मृतांची संख्या दोन वर पोहचली आहे .


या दुर्घटने नंतर ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यातील बांधकामांचा प्रश्न चर्चेत आला असताना स्थानिक नारपोली पोलिसांनी या दुर्घटनेस जबाबदार धरत मूळ गोदाम मालक सूर्यकांत विठ्ठल पाटील ,रामचंद्र शांताराम पाटील ,महादेव शांताराम पाटील यांसह या गोदामांच्या देखभालीची जबाबदारी असणाऱ्या व्ही आय बिल्डकॉम प्रा.लि. या विकासक कंपनीस जबाबदार धरत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र सदरच्या अनधिकृत बांधकामांना प्रोचाहन देणाऱ्या एमआरडीएच्या अधिकाऱ्यानं विरोधात कोणतीच कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये अच्यर्य व्यक्त केला जात असून या अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे .या दुर्घटनेत एकूण बारा गोदामांचे नुकसान झाले असून दोन जणांच्या मृत्यु सह पाच जण जखमी झाले आहेत.


       ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी विकासक आपल्या ताब्यात घेऊन सुस्थितीतील गोदामे स्वतःच्या ताब्यात घेऊन त्याच्या विक्रीतून पैसा कमावून स्थानिक जमीन मालकांना कमकुवत बांधकामे असलेली मालमत्ता देऊन त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असून या परिसरातील बांधकामांवर एमएमआरडीए प्रशासनाचे लक्ष नसल्याने मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होऊन स्थानिक शेतकरी जमीन मालक व शासन यांची फसवणूक करीत असल्याचे अनेक प्रकार समोर येत असल्याने त्यांना आळा घालणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिकां कडून केली जात आहे .


          स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकसित करण्यासाठी घेवून वर्षानुवर्ष त्यांच्या हिश्याचे विकसित बांधकाम देण्यास टाळाटाळ करणारे बिल्डर, व जे विकसित बांधकाम दिले तेसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचे ते पडल्यावर खऱ्या अर्थाने असे कमकुवत बांधकाम करणारे ठेकेदार व वास्तुविशारद यांचेवर गुन्हे दाखल करणे अभिप्रेत असताना पोलीस मात्र स्थानिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करत आहेत हे दुर्दैवी आहे. स्थानिक भूमिपुत्रांमधे असंतोष पसरवण्याचे काम पोलीस व प्रशासन करीत आहे. या अन्यायाविरद्ध आम्ही नक्कीच भूमिपुत्र शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू अशी प्रतिक्रिया आगरी कोळी भूमिपुत्र महासंघा चे अध्यक्ष अँड.
भारद्वाज चौधरी यांनी दिली आहे.
भिवंडीत गोदाम दुर्घटनेत मृतांची संख्या दोन गोदाम मालकांसह विकासकावर गुन्हा दाखल भिवंडीत गोदाम दुर्घटनेत मृतांची संख्या दोन  गोदाम मालकांसह विकासकावर गुन्हा दाखल Reviewed by News1 Marathi on February 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads