Header AD

एन.आर.सी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद काही महिलांसह कामगारांना अटक


◆काँलनीतील तोडक कारवाईला महिलावर्गाने केला विरोध...


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : एन.आर.सी.तील कामगार वसाहत आज पुन्हा तोडण्यास घेतल्याने संतप्त महिलांनी विरोध दर्शविल्याने पोलिस आणि आंदोलकांना मध्ये वाद झाल्याने पोलिसांनी काही महिलांसह कामगारांना त्याब्यात घेतले होते.


गेल्या आठवड्यापासून मोहने येथे एनआरसी संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन सुरु असून कामगारांना थकीत देणी मिळण्याबाबत परिसरातील विविध राजकीय पक्षसामाजिक संघटनाव्यापारीरिक्षा चालक आदींनी एक दिवसासाठी बंद देखील पुकारला होता. कल्याण पश्चिम चे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईरमनसेचे आमदार राजू पाटील यांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदवून व्यवस्थापनाच्या विरोधात आपण कामगारांच्या बाजूने असल्याचे सांगितले होते.


एनआरसी कामगार वसाहतीत रिकामे बंगले,  इमारती तोडण्याचे काम आज पुन्हा सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात महिला वर्ग त्याठिकाणी जाऊन कारवाईला विरोध केला. यामुळे खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी पोलीस बळाचा वापर करून महिलांना पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याचा आरोप कामगार नेते अर्जुन पाटील अटाळीकर यांनी केला आहे. दरम्यान मोहने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ व्यवस्थापनाच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी दररोज शेकडो आंदोलन करते ठिय्या धरून बसत आहे.


एनआरसी मधील सुमारे ४ हजार कामगारांची थकीत देणी एक हजार ३८४ कोटी असून याबाबत न्यायालयीन लढा सुरु आहे. कामगारांची थकीत देणी दिल्यानंतरच तोडकाम करावे अशी कामगारांची भूमिका आहे. आज  ज्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यांना संध्याकाळ पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून नंतर सोडण्यात आले. पोलिसांच्या या दडपशाहीचा आंदोलक कामगार वर्गाने निषेध केला असल्याची माहिती आयटक युनियनचे प्रतिनिधी अर्जुन पाटील यांनी दिली. 

एन.आर.सी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद काही महिलांसह कामगारांना अटक एन.आर.सी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद काही महिलांसह कामगारांना अटक   Reviewed by News1 Marathi on February 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads