Header AD

रोजगार निर्मिती करिता महिलांना रोटरी क्लबच्या माध्यमातून ब्युटी पार्लर साहित्याचे वाटप
कर्जत, प्रतिनिधी :  कोरोनाच्या काळात अनेक जणांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेकजण मिळेल ती काम करू लागले. या बेरोजगारीचा फटका महिलांना देखिल मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे अनेक महिला स्वयंम रोजगाराकडे वळाल्या आहेत. आशा महिलांना स्वयंम रोजगार मिळून देण्यासाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या माध्यामातून कर्जत तालुक्यातील तिवरे येथील जागृती प्रकल्पामध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विभागातील महिला तसेच युवकांचे जीवनमान उंचविण्याचे कौशल्य निर्माण केले जाते.

         

        त्याचाच एक भाग म्हणून. ग्रामीण विभागातील महिलांना ब्युटी पार्लरचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले दिले गेले होते. या प्रशिक्षित महिलांनी आपल्या पायावर उभे राहून एक चांगल्या प्रकारचे उद्योजक बनावे. आपला स्वःताचा रोजगार निर्माण करावा या करीता मुंबई येथील रोटरी क्लब ऑफ बाॅम्बे हॅगिंग गार्डन  च्या माध्यमातून कर्जत, मुरबाड, नंदूरबार व कफपरेड येथील ३५ महिलांना ब्युटी पार्लर चे संपूर्ण साहित्य उपलब्ध करून दिले.


         यावेळी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कर्जतचे जेष्ठ वकील कैलास मोरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे ऑनलाईनचे थेट प्रेक्षेपण करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लबचे दीपक झवेरी (अध्यक्ष, मुंबई), दिगत शहा, दिलीप शहा, अमरीश दप्तरी, तसेच ट्रस्टच्या शहनाज कुपर, यांनी सहभाग घेतला. हा संपूर्ण कार्यक्रम लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या संचालिका विली डॉक्टर यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाला.


          या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य ट्रस्टचे रमेश दासवानी (सी.ई.ओ.), कमल दमानिया (सी.ओ.ओ.), या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम कनोजे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता बडेकर यांनी केले तर उपस्थिती महिला व मान्यवराचे आभार हरिभाऊ व्होला यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र भोईर, तानाजी मिणमिणे यांनी अथक परिश्रम घेतले.

रोजगार निर्मिती करिता महिलांना रोटरी क्लबच्या माध्यमातून ब्युटी पार्लर साहित्याचे वाटप रोजगार निर्मिती करिता महिलांना रोटरी क्लबच्या माध्यमातून ब्युटी पार्लर साहित्याचे  वाटप Reviewed by News1 Marathi on February 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads