Header AD

गोपाळनगर शिवसेना शाखेत राजेश कदम , सागर जेधे यांंसह अनेकांचा सत्कार...


 


डोंबिवली , शंकर जाधव   :  मनसे पक्ष सोडून शिवबंधन हाती बांधलेल्या राजेश कदम, सागर जेधे यांसह अनेकांचा डोंबिवली पूर्वेकडील गोपाळनगर येथील शिवसेना शाखेत जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी माजी नगरसेवक तात्या माने यांच्या हस्ते कदम यांच्या शाल, आणि तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी अभिजित थरवळ ,सतीश मोडक,अमोल पाटील, संजय मांजरेकर, प्रकाश तेलगोटे,अमोद वैद्य, तानाजी महांगरे, अक्षय सणस, सागर दुबे,सारीका चव्हाण, राणी येवले, यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी माजी नगरसेवक तात्या माने म्हणाले, समाजकार्यासाठी सर्वानी झोकून देऊन हिंदयहृद्यसम्राट  स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनतेला सांगत राहू.तर राजेश कदम म्हणाले, मी १० वीत असताना सबिरभाई शेख यांचा प्रचार केला होता. 


इतर पक्षाच्या पदावर गेलो तरी जे ज्ञान या पक्षातून मिळाले होते.त्यावेळी भाजपचा बालेकिल्ला ही ओळख त्यावेळी शिवसेनेने पुसून टाकली होता.जे काही पद , मोठेपणा, मान जे मिळाले ते शिवसेनेनेमुळे मिळाले.आपल्याला डोंबिवलीत शिवसेना  अजून मजबूत करा असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला शिवबंधन बांधताना सांगितलं होतं.डोंबिवलीच्या समस्येवर आंदोलन करायचो.पत्रीपुल बनवण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा प्रयत्न पहिला.आम्ही किती दिवस संघर्ष करायचा,म्हणून डोंबिवली भगवा मय करायला आहे.
गोपाळनगर शिवसेना शाखेत राजेश कदम , सागर जेधे यांंसह अनेकांचा सत्कार... गोपाळनगर शिवसेना शाखेत राजेश कदम , सागर जेधे यांंसह अनेकांचा सत्कार... Reviewed by News1 Marathi on February 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads