Header AD

कचऱ्याच्या आर सी गाड्यांमधुन ओला कचरा नेण्यामुळे अपघात….

 

 डोंबिवली शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आर.सी.वाहनातून ओला कचरा वाहून नेताना रस्त्यावर पडणाऱ्या चिकट पाण्यामुळे  घरडा सर्कल जवळ दुचाकी घसरुन झालेल्या आपघातात  एक  दुचाकी स्वार जखामी झाला.त्यामुळे वारंवार असे अपघात होऊ नयेत म्हणून या आर.सी.वाहनातून ओला कचरा वाहुन नेऊ नये अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.  पालिकेच्या स्वच्छता आभियाना अंतर्गत ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करुन वेगवेगळा उचलण्याचे नियोजन केले आहे. शहरातील ओला कचरा कचऱ्याच्या छोट्या घंटागाड्या गाड्यामार्फत आयरेगावातील बायोगस प्रकल्प व उंबार्डे येथील खत प्रकल्प येथे नेण्यात येतो. परंतु रस्त्यातून जाताना गाडीतील कचऱ्यातील द्रवपदार्थ खाली रस्त्यावर पडत आहे.परिणामी अशा ओल्या रस्त्यावर मागून येणाऱ्या  दुचाकी वाहन चालकांचा तोल जाऊन अपघात होण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. 
डोंबिवलीत अशा घटना वारंवार घडत असून बुधवारी कचऱ्याची गाडी क्रमांक एमएच-०५-डीके-६८४६ मधून शहरातील ओला कचरा नेला जात होता.पूर्वेकडील पालिकेच्या संत सावळाराम महाराज क्रीडांगणलगत असणाऱ्या कल्याण रस्तावरील बंदिश हॉटेल उतारावर कचऱ्यातील द्रवपदार्थामुळे रस्ता निसरडा झाल्यामुळे  दुचाकी घसरून चालक गंभीर जखमी झाला आहे.या अपघातात सुदैवाने त्याच्या जीवाला धोका झाला नसला तरी असे अनेक अपघात झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्येवर ताबडतोब कारवाई करून प्रसासनाने समस्या सोडवावी अशी  मागणी येथील नागरिक पवन भागवत भिसे आणि प्रकाश ब्रम्हदेव सागरे यांनी पालिका प्रशासनास पत्र पाठवून केली आहे.

कचऱ्याच्या आर सी गाड्यांमधुन ओला कचरा नेण्यामुळे अपघात…. कचऱ्याच्या आर सी गाड्यांमधुन ओला कचरा नेण्यामुळे  अपघात…. Reviewed by News1 Marathi on February 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads