Header AD

शिवसेनेच्या रेशनकार्ड शिबिरामुळे ६०० कुटुंबांना दिलासा

 कल्याण , कुणाल  म्हात्रे    कल्याणमधील अनेक कुटुंबांकडे रेशनकार्ड नसल्याने ते धान्यापासून वंचित असल्याची बाब समोर आल्यानंतर शिवसेनेच्यावतीने शिधापत्रिका शिबिर घेण्यात आले. यामध्ये ६०० कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला. या कुटुंबांना एकही रुपया खर्च न करता नवीन रेशनकार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अर्ज मंजूर झालेल्या सर्वांना शिवसेनेच्या वतीने रेशनकार्ड घरपोच केली जाणार आहेत.


कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीत गरीब कुटुंबांची परवड होऊ नये यासाठी शासनाकडून मोफत धान्य पुरवले जात आहे. मात्र अनेक कुटुंबांकडे रेशनकार्ड नसल्याने ते धान्यापासून वंचित आहेत. शिवाय अनेक शासकीय योजनांचा लाभही त्यांना मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन महसूल प्रशासनाच्या सहकार्याने शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक विजया पोटे यांनी बेतूरकरपाडा येथे शिबीर आयोजित केले होते.


 शिबिरात एकाच ठिकाणी नवीन रेशन कार्ड बनवणेनावात बदलआधारकार्ड लिंकपत्ता बदलनावे कमी करणे किंवा वाढवणे या सेवा नागरिकांना मिळाल्या. आठशे नागरिकांना शिबिराचा लाभ झाला. यातील ६१५ कुटुंबांना नव्याने रेशनकार्ड मिळणार आहेत. यावेळी माजी नगरसेवक अरविंद पोटेसंतोष भोईर आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या रेशनकार्ड शिबिरामुळे ६०० कुटुंबांना दिलासा शिवसेनेच्या रेशनकार्ड शिबिरामुळे ६०० कुटुंबांना दिलासा Reviewed by News1 Marathi on February 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads