शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी केला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यां समवेत वाढदिवस साजरा
कल्याण , कुणाल म्हात्रे : भिवंडी पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले यांनी आपला स्वतःचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथील विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करून विद्यार्थ्यांबरोबरच स्वतःचा आनंद द्विगुणित केला. यावेळी राहनाळ शाळेचे मुख्याध्यापक सुरेश साळुंखे, पदवीधर शिक्षक अजय पाटील, सहशिक्षिका चित्रा पाटील, अनघा दळवी, संध्या जगताप हे शिक्षक उपस्थित होते.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला. या वेळी अस्वले यांनी शालेय विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल आणि खाऊचे वाटप केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी अस्वले यांना स्वतः बनवलेला वॉलपीस भेट दिले. शालेय विद्यार्थ्यांच्या बरोबर वाढदिवस साजरा करावा हे माझ्या मनात होते. तो क्षण आज मला आनंद देऊन गेला. अशी प्रतिक्रिया अस्वले यांनी व्यक्त केली.

Post a Comment