गणपती साठी ७५ किलो मोत्त्यांचे मखर
◆नगरसेवक कुणाल पाटील यांच्या घरी माघी गणेशोत्सव...
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या घरी यंदाही माघी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावर्षी गणपतीसाठी तब्बल ७५ किलो मोती वापरून मखर बनविण्यात आले आहे. गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून पाटील कुटुंबीय आपल्या घरी माघी गणपती बसवतात.
गणपती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी कुणाल पाटील यांनी केले होते. या गणपतीसाठी तब्बल ७५ किलो मोत्यांचा मखर साकारला होता. विविध रंगांच्या मोत्यांनी लाडक्या गणरायासाठी आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. हा देखावा साकारण्यासाठी तब्बल ६० दिवसांचा कालावधी लागला. राजेश गायकर, मनिष गायकर, जयेश पाटील, आकाश गायकर आणि त्यांच्या सहकार्यांनी ही सजावट केली होती.
कुणाल पाटील यांच्याहस्ते सपत्नीक गणरायाची पूजा करण्यात आली. आमदार राजू पाटील यांच्यासह गोळवली तसेच आसपासच्या परिसरातील हजारो भाविकांनी या गणपतीचे दर्शन घेतले. दीड दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा करून पाटील कुटुंबीयांनी भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. यावेळी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह उद्योगपती अनिल पाटील, मयूर पाटील, मनोज गायकवाड आदींसह पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment