Header AD

दिवसा पेंटर अन रात्री करायचा दुचाक्यां लंपास ; आतापर्यत ६ दुचाक्या हस्तगत

 


भिवंडी , प्रतिनिधी  :  दिवसभर घराघरांमध्ये पेंटरचे काम करणारा कारागिरीच दुचाक्या लंपास करणारा चोरटा निघाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दिवसा दुचाक्यांची रेकी करून ठेवायची आणि त्यांनतर दुचाक्या लंपास करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करून पोलिसांनी या पेंटर बाबू असलेल्या दुचाक्या चोरट्याला अटक केली आहे. अब्दुलाह मोहंमद तकी शेख (वय २२, रा.आजमीनगर, भिवंडी )असे या चोरट्याचे नाव आहे. 

 

◆पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून चोरट्याला पकडले .. 


भिवंडी शहरात दिवसांगणिक ४ ते ५ दुचाक्या चोरीच्या घटना घडतच असून अशीच एक दुचाकी भिवंडीतील देवजीनगर मधील एका इमारतीत राहणारे अहमद शेख यांची दुचाकी इमारतीच्या पार्किंगमधून २७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास चोरीला गेली होती. त्यांनी याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात  अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला असता खबऱ्याकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. ए. इंदलकर यांना माहिती मिळाली होती. कमी किंमती एक  पेंटर दुचाकी विकत आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक तानाजी वाघ. सहायक पोलीस निरीक्षक टी. बी. वाघ , पोना गोरले, पोशी. सूर्यवंशी , कुंभार , कवडे , गायकवाड या पोलीस पथकाने बनावट ग्राहक पाठवून कमी किंमतीत चोरीची दुचाकी विकताना चोरट्या अब्दुलाहला ताब्यात घेतले.  

 

 ◆दुचाकी लंपास करून ठेवायचा मोकळ्या मैदानात  ... 


चोरट्या  अब्दुलाहकडून  आतापर्यत पोलिसांनी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन लंपास केलेल्या २ लाख ३५ हजार किंमतीच्या सहा दुचाक्या त्याच्याकडून हस्तगत  केल्या आहे. विशेष म्हणजे दुचाकी लंपास करून ते मोकळ्या मैदानात असलेल्या ठिकाणच्या पार्किंगमध्ये उभ्या करून त्या चोरीच्या दुचाक्या ८ ते १० हजार रूपयांत विक्री करायचे ठरवले होते. मात्र पहिल्याच दुचाकी विक्री करताना  ग्राहक पोलीसच भेटल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. 

दिवसा पेंटर अन रात्री करायचा दुचाक्यां लंपास ; आतापर्यत ६ दुचाक्या हस्तगत दिवसा पेंटर अन रात्री करायचा दुचाक्यां लंपास ; आतापर्यत ६ दुचाक्या  हस्तगत Reviewed by News1 Marathi on February 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads