भररस्तात एसटी बसच्या चाकाचे नटबोल्ट गायब प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच
कल्याण , कुणाल म्हात्रे : रस्त्यावर चालत असतांना एसटी बसमधून आवाज आल्यानंतर बस थांबवून जेव्हा बघितलं गेलं तर बसमधील एका चाकाचे सर्व नटबोल्टच गायब होते. वेळेवर प्रसंग माहिती पडल्याने एक मोठा अपघात टळला आहे. मात्र यामुळे बसेसची कशाप्रकारे देखरेख केली जाते या घटनेमुळे समोर आलं आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा निष्काळजी पणा यामुळे उघडकीस आला आहे.
कल्याण शिळ रोडवर एक एसटीबस भररस्त्यात थांबली होती. सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी त्या रस्त्यावरून जात असतांना त्यांची नजर या बसवर पडली. चालक आणि वाहकाला विचारपूस केली असता, माहिती पडले कि बसमधील एका टायरचे नटबोल्ट गायब आहेत. हा प्रकार समजताच बसमधील प्रवाशांना उतरविण्यात आले आणि बस दुरुस्तीसाठी कल्याण बस आगाराला संपर्क करण्यात आला.
योगेश दळवी यांनी बसचा व्हिडीओ काढला. नटबोल्ट कसे पडले हे कोणाला माहिती नाही. एवढे नक्की कि, बस डेपो मधून निघतांना बसची चाचणी केली नव्हती. हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु असून शासनाने आणि परिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी योगेश दळवी यांनी केली आहे.तर याबाबत कल्याण आगाराचे व्यवस्थापक विजय गायकवाड यांना विचारले असता, हि बस पनवेल डेपोची असून गाडीच्या दुरुस्तीचे काम कल्याण बस डेपोमध्ये सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment