Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे
कल्याण , कुणाल म्हात्रे : मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...


कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ६१ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ७५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.
आजच्या या ७५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६१,००५ झाली आहे. यामध्ये ७६५ रुग्ण उपचार घेत असून ५९,०९१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर आतापर्यत ११४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ७५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१८, कल्याण प – २६, डोंबिवली पूर्व – १८, डोंबिवली प-८, मांडा टिटवाळा- ४, तर मोहना येथील १ रूग्णाचा समावेश आहे.
डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ४ रुग्ण टाटा आमंत्रा येथून, ४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून तर ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.
कल्याण , कुणाल म्हात्रे : मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...
Created By SoraTemplates & MyBloggerThemes
Back To Top
Post a Comment