मनसेला दुसरा धक्का माजी नगरसेवक मंदार हळबे भाजपात
डोंबिवली , शंकर जाधव : मनसेचे उपाध्यक्ष राजेश ककदम यानी पक्षाच्या ताता करत शिवबंधन हाती बांधले.या धक्कानंतर मनसेला आणखी एका धक्का बसला आहे.मनसेचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी मुंबईत माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. एकापाठोपाठ दोन मोठे नेते पक्ष सोडून गेल्याने मनसे पक्षाला हा मोठा धक्का बसला आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्य आगामी निवडणुकीत राजकीय घडामोडी घडल्याने खरी लढत आता शिवसेना आणि भाजपा पक्षात होणार आहे.
मंदार हळबे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार रविंद्र चव्हाण यांच्या समोर मनसेचे उमेदवार म्हणून मंदार हळबे यांना उमेदवारी दिली होती.या निवडणुकीत मनसेने सुमारे ६५ हजार मते मिळाली होती.त्यामुळे विधानसभेचा प्रतिस्पर्धी भाजपमध्ये आल्याने भाजपची ताकद वाढणार का हे लवकरच समजेल.याबाबत भाजप कल्याण जिल्हाअध्यक्ष शशिकांत कांबळे यांना विचारले असता ते म्हणाले,मंदार हळबे हे पूर्वीपासून भाजपाच्या विचारांशी आकर्षित होते.हळबे यांचे आम्ही पक्षात स्वागत करतो.दरम्यान मनसेतील दोन मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडल्याने मनसैनिकांमध्ये चर्चा रंगली आहे.

Post a Comment