पोलिसांना तपासात मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादी कडून भोपर देसले पाड्यातील गजानन चौकात सीसीटीव्ही कॅमेरे
डोंबिवली ( शंकर जाधव ) लॉकडाऊननंतर चोरी, मोटरसायकल चोरी, दरोडा, सोनसाखळी चोरी अश्या गुन्हात वाढ होत आहे. डोंबिवली सारख्या शहरात जिथे गुन्हे नियंत्रणात आणण्यास पोलिसांना यश आले होते त्या शहरात आता पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढले आहे.भरदिवसा अश्या प्रकारच्या घटना घटत असताना पोलिस चोरट्यांना पकडण्यास पप्रयत्न करत आहेत.पोलिसांना तपासात मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादीने हात पुढे केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कल्याण –डोंबिवली जिल्हा सचिव अॅड.ब्रम्हा माळी यांनी पुढाकार घेऊन डोंबिवली पूर्वेकडील भोपर देसले पाड्यातील गजानन चौकात पाच सीसीटीव्ही कॅमेरे लावले.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ पाटील,कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील,जगदीश ठाकूर,निरंजन भोसले,राजेंद्र नांदोस्कर,प्रशांत शिंदे, मधुकर शेळके,सुरय्या पटेल,उज्ज्वला भोसले आदिसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सदर कार्यक्रमात माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पूजन केले. सामाजिक कामात खारीचा वाटा म्हणून अॅड.ब्रम्हा माळी यांनी स्वखर्चाने भोपर देसले पाड्यातील गजानन चौकात पाच सिसिटीव्ही लावले.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कल्याण –डोंबिवली जिल्हा सचिव अॅड.ब्रम्हा माळी यांच्या समाजकार्य करत राहणे हि चांगली बाब आहे.शहरात चोरी, दरोड्याचे प्रमाण वाढत आहे.
त्यामुळे पोलिसांना तपासात मदतमिळावी म्हणून राष्ट्रवादीने मदतीचा हात दिला आहे.तर अॅड.ब्रम्हा माळी म्हणाले, जनतेची सुरक्षितता खूप महत्वाची आहे.दिवसरात्र पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना नागरीक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे.त्यामुळे राष्ट्रवादीने नागरिकांच्या मदतीला आली आहे. भोपर देसले पाड्यातील गजानन चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने महिला सुरक्षित राहतील.

Post a Comment