Header AD

रिंगरूट रस्ता बाधितांचे उपोषण आमादार राजू पाटील यांच्या आश्वासनाने मागे
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्षेत्र कार्यालयावर रिंग रूट रस्त्यामध्ये घरे जाणाऱ्या आंबिवली अटाळी मांडा टिटवाळा येथील ८९० कुटुंबीयांनी आपल्या परिवारासह बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. मनसे आमदार राजू पाटील यांनी या उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना आयुक्तांची भेट घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वसन दिल्याने बाधीतांनी उपोषण मागे घेतले.


रिंगरुट या रस्त्यामध्ये अटाळी आंबिवली मांडा टिटवाळा येथील ८९० घरांवर तोडक कारवाई करण्यासाठी "अ " प्रभाग क्षेत्र कार्यालयाकडून बाधितांना घरे खाली करण्यासंदर्भात नोटीस पाठविण्यात येत आहेत. आत्तापर्यंत ८९० कुटुंबीयांना नोटीस पाठवून झाल्या असून कारवाई करण्यासाठी प्रभाग कार्यालयातून सातत्याने दबाव येत आहे त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून आपल्या हक्काचे घर रस्त्यात बाधित होत असल्याने हवालदिल झाले आहेत. बाधितांनी थेट प्रभागक्षेत्र कार्यालयासमोर भर उन्हात आपल्या लहान मुलांसह तसेच कचऱ्याच्या गाडीजवळ दुर्गंधीयुक्त जागेत उपोषण सुरू केले होते.


आम्ही पै पैं  पैसा जमा करून दागिने मोडून नातेवाईक व सावकाराकडून कर्ज घेऊन बिल्डर कडून घर घेतले आहे. आम्हाला जर घर मिळाले नाही तर आम्ही गोरगरिबांनी कोणाकडे न्याय मागायचा घराच्या बदल्यात आम्हाला घर पाहिजे आहे आमच्या घरावर कारवाई करण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला जात आहे परंतु बिल्डरांवर कारवाई होत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.


संध्याकाळी मनसे आमदार राजू पाटील यांनी "अ" प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या दालनात रिंग रूट मध्ये घरे बाधित होणाऱ्या उपोषणकर्ते शिष्टमंडळासह धडक देत रिंग रूट मध्ये बाधित होणाऱ्या घराच्या कुटुबीयांचे पुर्नवसना बाबत जाब विचारत धारेवर धरले. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा असे खडे बोल सुनावले. त्यानंतर उपोषण कर्तीची भेट घेत या प्रश्नाबाबत मनपा आयुक्ताची दोन दिवसात भेट घेऊन पुनर्वसन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगत  उपोषण मागे घेण्यास सांगितले.


    या बाबत अ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांना विचारले या उपोषणा बाबत आयुक्तांना माहिती दिली असून आयुक्त महोदय जो निर्णय घेतील त्यानुसार उपोषणकर्त्यांबरोबर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे मोकल यांनी सांगितले.  


रिंगरूट रस्ता बाधितांचे उपोषण आमादार राजू पाटील यांच्या आश्वासनाने मागे रिंगरूट रस्ता बाधितांचे उपोषण आमादार राजू पाटील यांच्या आश्वासनाने मागे Reviewed by News1 Marathi on February 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads