Header AD

डुंगे ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी लक्ष्मी पाटील तर उपसरपंच पदी जितेंद्र पाटील यांची बिन विरोध निवड





भिवंडी दि . १२ (प्रतिनिधी )  तालुक्यातील डुंगे ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मी गणेश पाटील तर उपसरपंच पदी जितेंद्र दयानंद पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे . बुधवारी तालुक्यातील २८ ग्राम पंचायतींच्या सरपंच उपसरपंच पदासाठी निवडणूका पार पडल्या . यावेळी ग्राम पंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा कृषी सहाय्यक बाळकृष्ण गायकवाड यांच्या उपस्थितीत सरपंच उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. 

यावेळी लक्ष्मी गणेश पाटील यांचा सरपंचपदासाठी तर जितेंद्र दयानंद पाटील यांचा उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक एक उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी डुंगे गावच्या सरपंचपदी लक्ष्मी गणेश पाटील तर उपसरपंचपदी जितेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली . त्यांची निवड जाहीर होताच त्यांच्या सार्थकांनी फटाके फोडून व गुलाल उधळत एकच जल्लोष केला. 

दरम्यान गलिच्छ राजकारणाला दूर ठेऊन गावातील ग्रामस्थांनी आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे त्या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नाही तसेच गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच लक्ष्मी गणेश पाटील यांनी दिली आहे .


यावेळी ग्राम पंचायत डुंगे येथील निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य निलेश भगत , शैलेश पाटील , छत्रपती पाटील , जयश्री पाटील , शर्मिला पाटील यांचादेखील ग्रामस्थांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गावातील जैष्ठ नागरिक दयानंद पाटील , पंढरीनाथ पाटील , उद्योगपती दीपक पाटील तसेच अनिल पाटील , कैलास पाटील , संजय पाटील , धर्मेद्र पाटील यांच्यासह , महिला , व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
डुंगे ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी लक्ष्मी पाटील तर उपसरपंच पदी जितेंद्र पाटील यांची बिन विरोध निवड डुंगे ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी लक्ष्मी पाटील तर उपसरपंच पदी जितेंद्र पाटील यांची बिन विरोध निवड Reviewed by News1 Marathi on February 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कंपनीच्या आवारातच केमिकल सांड पाण्यावर मायक्रो ऑर्गनिझम टेक्नोलॉजीचा प्रयोग पुणे,औरगाबाद नंतर डोंबिवलीत

डोंबिवली (शंकर जाधव ) डोंबिवली एमआयडीसी मधील जवळपास ९० टक्के कारखान्या मध्ये केमिकल मिश्रित सांडपाणी हे सांडपाणी प्रकिया केंद्रापर्यत वाहून ...

Post AD

home ads