Header AD

यप्पटीव्हीची बीएसएनएल सोबत भागीदारी‘यप्पपटीव्ही स्कोप प्लॅटफॉर्म’ केले लॉन्च...


मुंबई, ४ फेब्रुवारी २०२१ : यप्पटीव्ही हा अग्रगण्य जागतिक ओटीटी प्लॅटफॉर्मने भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सोबत भागीदारी करून यपटीव्ही स्कोप हा नव्या युगातील तंत्रज्ञान समर्थित सिंगल सबस्क्रिप्शन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. बीएसएनएलसोबत पूर्वी केलेल्या करारानुसार, सामुहिक ओटीटी सेवा ट्रिपल प्ले ऑफरिंग म्हणून ब्रॉडबँड सबस्क्रायबर्सना देत, यप्पटीव्हीने बीएसएनएल ब्रॉडबँड यूझर्सना एकत्रित व्हिडिओ सर्व्हिस लाँच केल्या आहेत.


अशा प्रकारची युनिक सेवा जगात प्रथमच अशा प्लॅटफॉर्मवर दिली जात आहे. यप्पटीव्ही स्कोपवर सोनिलिव्ह, झी५, वूट सिलेक्ट आणि लाइव्ह टीव्ही चॅनल्सचे यप्पटीव्ही अॅग्रिगेटर या सारख्या सर्व ओटीटी प्रीमियम अॅपचे सिंगल सबस्क्रिप्शन यूझर्सना दिले जात आहे. यामुळे विविध अॅप्स घेणे व त्याचे व्यवस्थापन करण्याचे त्रासदायक काम वाचेल. बीएसएनएलचा अफाट प्रेक्षक आधार पाहता, प्लॅटफॉर्मने टेक-सेव्ही आणि लेगसी केबल टीव्ही यूझर्स या सर्वांना लाभ करून दिला आहे. लेगसी यूझर्ससाठी प्लॅटफॉर्मने जे केबल टीव्हीशी जुळलेले आहेत, त्या ग्राहकांना पारंपरिक टीव्हीसारखा अनुभव प्रदान केला, हे करताना त्यांना लाइव्ह टीव्ही चॅनेल स्वीच करण्याची परवानगीही दिली.


यप्पटीव्हीचे संस्थापक व सीईओ उदय रेड्डी म्हणाले, ‘बीएसएनएलच्या भागीदारीने आमचे सिंगल सबस्क्रिप्शन ओटीटी प्लॅटफॉर्म- यप्पटीव्ही स्कोप लाँच करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या लाँचिंगद्वारे या क्षेत्रातील सर्व स्टेकहोल्डर्सना एक उत्कृष्ट इकोसिस्टिम निर्माण करण्याची संधी देत आहोत. ही सुविधा प्रमुख कंटेंट पार्टनर्स, ब्रॉ़डकास्टर्स, टेलिकॉम, ब्रॉडबँड प्रदात्यांना एकत्रितपणे मिळते. तंत्रज्ञानानुसार आधुनिक असलेला व सर्वसमावेशक युनिक आणि अखंड व्हिडिओ एंटरटेनमेंट अनुभव फक्त बीएसएनएलच्या ग्राहकांना प्रदान केला जात आहे. या प्लॅटफॉर्मवर आम्ही लवकरच अधिक अॅप्स जोडणार आहोत.”

यप्पटीव्हीची बीएसएनएल सोबत भागीदारी यप्पटीव्हीची बीएसएनएल सोबत भागीदारी Reviewed by News1 Marathi on February 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads