भिवंडी येथे आरपीएफ टीमने ई-तिकिट दलालास पकडले.
भिवंडी , प्रतिनिधी : ई-तिकिटांच्या विरोधात मोहिमेच्या वेळी भिवंडी रोड आरपीएफच्या पथकाने श्री प्रशांत चौधरी, सहाय्यक उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वात, श्री अनवर शहा, सहाय्यक उपनिरीक्षक, श्री विनोद राठौर, हेड कॉन्स्टेबल व श्री नीलकंठ गोरे, कॉन्स्टेबल यांनी भिवंडी येथून दोन दलालांना पकडले. ते अवैधपणे 11 वैयक्तिक आयडीचा उपयोग करून रेल्वे आरक्षणाच्या ई-तिकिटांच्या विक्रीत गुंतले होते. त्यांच्याकडील सीपीयू + मॉनिटर, एक मोबाईल, 3 लॅपटॉप सह रु. ३०,७२५ किमतीची २० प्रवासाची ई-तिकिटे आणि रु. ४०,५६२ किमतीची ३८ मागील प्रवासाची ई-तिकिटे (असे एकूण रु. ७१,२८७) जप्त करण्यात आले. रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या देखरेखीखाली असलेल्या हेल्पलाईनवरून आरपीएफ डोंबिवलीला माहिती मिळाली की डोंबिवली लोकलमध्ये एक काळ्या रंगाची ट्रॉली बॅग प्रवाशाकडून राहून गेली आहे. बॅगमध्ये एक प्रोजेक्ट मशीन ज्याचे मूल्य रु. ३५,००० / - आणि रु. ७,५०० / - किंमतीचे कपडे आणि शूज होते. उपरोक्त माहिती मिळाल्यावर आरपीएफ डोंबिवलीच्या महिला कॉन्स्टेबल कु. कामिनी सोनकर यांनी डोंबिवलीला लोकल आल्यावर उपस्थित राहून बॅग परत मिळविली. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर बॅग अमरावती येथील बॅगचे मालक श्री आनंद मिश्रीकोटकर यांच्याकडे देण्यात आली व त्यांनी तातडीने कारवाई करून बॅग मिळवून दिल्याबद्दल आरपीएफ टीमचे आभार मानले.
दुसर्या एका घटनेत आरपीएफ हेल्प लाईनवरुन फोन आला की, सुश्री शिल्पा गौड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सीआयडी ऑफिसमध्ये कार्यरत महिला कॉन्स्टेबल या कुर्ला कार शेडला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक खाकी कलरची बॅग ज्यामध्ये मौल्यवान कागदपत्रे आणि युनिफार्म आहे विसरल्या आहेत. ही माहिती ताबडतोब संबंधित ड्युटी कॉन्स्टेबल श्री मुकेश मीणा यांना दिली. त्यांनी काही मिनिटांतच बॅग शोधून काढली आणि कुर्ला येथील आरपीएफ कार्यालयात आणल्याची माहिती दिली. ही माहिती हेल्पलाईनला दिली गेली. काही तासांनंतर महिला पोलिस यांना योग्य ती पडताळणी करून बॅग सोपविण्यात आली त्यांनी आरपीएफ टीमचे आभार मानले.
भिवंडी येथे आरपीएफ टीमने ई-तिकिट दलालास पकडले.
Reviewed by News1 Marathi
on
February 11, 2021
Rating:

Post a Comment