Header AD

कल्याणची सागर कन्या श्रावणी हिचा नवा विक्रम
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची कल्याण येथील जलतरणपटू श्रावणी संतोष जाधव हिने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १४ कि.मी. सागरी अंतर ३ तास ४३ मिनिटात पोहून पूर्ण केले. कल्याणची सागर कन्या म्हणून ओळख असणारी श्रावणी जाधव हिने पोहून हे अंतर पार केले असून दोन वर्षांपूर्वी जागतिक विक्रम करणारी कल्याणची डॉली पाटीलच्या पावलावर पाऊल ठेवत श्रावणी हिने मोठी मजल मारली आहे.


श्रावणी हिने हे अंतर पार केल्यानंतर तिला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर  व स्थायी समिती सदस्या नगरसेविका सुजाता सानप आणि स्विमिंग अससोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे किशोर शेट्टी व संतोष पाटील उपस्तित होते. रुपाली रेपाळे यांनी निरीक्षक म्हणून काम पहिले. 

कल्याणची सागर कन्या श्रावणी हिचा नवा विक्रम  कल्याणची सागर कन्या श्रावणी हिचा नवा  विक्रम Reviewed by News1 Marathi on February 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads