Header AD

विना मास्क फिरणाऱ्या नागरिकां कडून`फ`प्रभाग क्षेत्र हद्दीत तीन दिवसात ३१,५०० रुपये दंड वसूल

सोशल डिस्टेंसिंगचे पालन न करणाऱ्याकडून १० हजार रु. दंड.

डोंबिवली ( शंकर जाधव ) विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर डोंबिवलीतील पालिकेच्या `फ`प्रभाग क्षेत्र हद्दीत गेल्या तीन दिवसात ३१,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर सोशल डिस्टेंसिंगचे पालन न करणाऱ्याकडून १० हजार रुपये दंड वसूल झाला असल्याची माहिती प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.फडके रोड, नेहरू मैदान, मानपाडा रोड प्रामुख्याने या भागात करवाई करण्यात आली.

    

      कोरोन रुग्ण संख्या कमी होऊन लागल्यावर तोंडावर मास्क लावण्याबाबत नागरीक दक्ष नव्हते.कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पाश्वर्भूमीवर पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर करवाईचे आदेश दिले आहे.त्याप्रमाणे शनिवार,रविवार आणि सोमवार या तिन्ही दिवसी करवाई करून दंड आकरण्यात आला आहे.लोक अजूनही मानसिकता अजूनही मास्क न लावण्याचे आणि पालिका कर्मचारी आणि पोलीसांवर वाद घालण्याचे प्रकार होत असल्याची माहिती `फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी सावंत यांनी दिली.


       ज्यांच्याकडे मास्क नसेल अश्यांना पालिकेकडून मास्कचे वाटप ककरण्यात येत आहे.उपहारगृहे,मंगल कार्यालये, उद्याने,खाजगी अस्थापना अश्या सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्यात आली.कोरोना विषयी प्रतीबंधात्मक नियमाचे उल्लघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे.तर शनिवारी `ग`प्रभाग क्षेत्र हद्दीत विविध अश्या विविध खाजगी अस्थापनांवर कारवाई करण्यात आली. विनामास्क ८ नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर रविवारी १२ विविध आस्थापनांचवर कारवाई करण्यात आली. तर विनामास्क ६ नागरिकांवर ३ हजार रुपये अशी दंडात्मक वसुली  केल्याची माहिती प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी दिली.   


विना मास्क फिरणाऱ्या नागरिकां कडून`फ`प्रभाग क्षेत्र हद्दीत तीन दिवसात ३१,५०० रुपये दंड वसूल विना मास्क फिरणाऱ्या नागरिकां कडून`फ`प्रभाग क्षेत्र हद्दीत तीन दिवसात ३१,५०० रुपये दंड वसूल Reviewed by News1 Marathi on February 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टीसीच्या सतर्क तेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण कल्याण रेल्वे स्टेशन वरील घटना सी,सी,टीव्हीत कैद

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :    कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर सकाळी साडेनऊ वाजता चालती पुष्पक एक्सप्रेस ट्रेन पकडण्याच्या प्रयत्न...

Post AD

home ads