Header AD

आझाद मैदानातील आंदोलन कर्त्या शिक्षकांची थर्मल स्क्रीनिंग कोविड पासून बचावा साठी आर्सेनिक एल्बम ३० वितरण




कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे संपूर्ण राज्यातील विनाअनुदानित शिक्षक २९ जानेवारी पासून  धरणे आंदोलनाला बसले आहेत. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यासाठी खबरदारी म्हणून साईं होम्योपैथिक मेडिकल कॉलेज एंड नित्यानंद हॉस्पिटलच्या वतीने आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली तसेच त्यांचा कोविड पासून बचाव व्हावा यासाठी आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वितरण देखील करण्यात आले.  


       गेल्या २० वर्षापासून अनेक शिक्षक आपले कार्य करत असून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या पायावर उभ केल आहे. असे असताना महाराष्ट्रातील हजारो विनानुदानित शिक्षक सरकारच्या मदतीपासून वंचित आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या शिक्षकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून २९ जानेवारीपासून महाराष्ट्राच्या कानाकोपरर्यातून मोठ्या संख्येने शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलनाला बसले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने साईं होम्योपैथिक मेडिकल कॉलेज एंड नित्यानंद हॉस्पिटलच्या वतीने आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली तसेच त्यांचा कोविड पासून बचाव व्हावा यासाठी आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वितरण देखील करण्यात आले.  


       यावेळी या कॉलेजच्या वतीने डॉक्टर जेपी शुक्ला यांनी आपले मनोगत व्यक्त करत शिक्षकांच्या या आंदोलनाचे समर्थन केले. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले कि, ज्या शिक्षकांनी डॉक्टर, इंजीनियर, मंत्री, अधिकारी बनवले तेच शिक्षक आज आपल्या हक्कासाठी लढत आहेत हि खेदाची बाब असून आंदोलक शिक्षकांनी शांतीपूर्ण मार्गाने आदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन डॉ. जे.पी. शुक्ला यांनी यावेळी केले. तसेच कोरोना वाढत असल्याने शिक्षकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कोरोना रोखण्यासाठीचे नियम पाळून आंदोलन करण्यास सांगितले. 

आझाद मैदानातील आंदोलन कर्त्या शिक्षकांची थर्मल स्क्रीनिंग कोविड पासून बचावा साठी आर्सेनिक एल्बम ३० वितरण आझाद मैदानातील आंदोलन कर्त्या शिक्षकांची थर्मल स्क्रीनिंग कोविड पासून बचावा साठी आर्सेनिक एल्बम ३० वितरण Reviewed by News1 Marathi on February 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads